Bhandara News: पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना झाली विषबाधा, भंडाऱ्यात खळबळ

Panipuri Poisoning: भंडारा जिल्ह्यातील सुकळी (दे) येथील ९ मार्च रोजी आयोजित समारंभात पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा झाली. अन्न व पाणीपुरी विक्रेत्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला.
Panipuri
Panipurifreepik
Published On

शुभम देशमुख/साम टीव्ही न्यूज

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी आयोजित एका समारंभात अन्न व पाणीपुरी विकणाऱ्याकडून पाणीपुरी खाल्ल्याने जवळपास ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार १० मार्च रोजी सकाळी समोर आला. यात २२ जणांना उपचारार्थ बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर उर्वरित ८ जणांना आंधळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सुट्टी देण्यात आली.

सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी अन्न वितरण करण्यात आले. काहींनी कार्यक्रमाजवळ असलेल्या ठिकाणी पाणीपुरी विक्रेत्यांकडील पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी व अन्नातून तब्बल ३० लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले. परिणामी, येथील महिला, पुरुष व लहान बालकांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला.

Panipuri
Maharashtra Politics: राजीनाम्यानंतरही पाय खोलातच; खंडणीची मागणी मुंडेंच्या कार्यालयात, पाहा स्पेशल रिपोर्ट

१० मार्च रोजी सकाळी हा प्रकार हळूहळू समोर आल्याने एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्या रुग्णांना प्रथम बेटाळा व देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना आंधळगाव येथील डॉ. अनिकेत सपाटे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर योग्य औषधोपचार करून त्यांना मंगळवार, ११ मार्चला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. विषबाधा झालेल्या तीसही रुग्णांची प्रकृती बरी असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Panipuri
Ulhasnagar Crime: ज्वेलर्समध्ये चोरी, अंगठीची अदलाबदली; नकली अंगठी  ठेवून सोन्याची खरी अंगठी पळवली

विषबाधा झालेल्यांमध्ये हर्षदा नान्हे, तन्हू नान्हे, अश्विनी बुरडे, कविता डोळस, अक्षय डोळस, निहार बांडेबुचे, श्रेयश ठवकर, रियांश ठवकर, कौशिक जगनाडे, दिवेश शहारे, भावेश राऊत, सुप्रिया नेरकर, प्रियांशी राऊत, कांता राऊत, मनीषा राऊत, संकेत राऊत, रेखा राऊत, प्रज्वल भुरे, योगेश शहारे, प्रतीक शहारे, संजय शेंडे, मंगेश शेंडे, वर्षा डोळस, श्रेया डोळस, सतीश मुंडे (सर्व रा. सुकळी) व इतरांचा समावेश आहे. अन्नातून व पाणीपुरीतून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. उपचारांसाठी बेटाळा व देव्हाडी आरोग्य केंद्रात तर काहींना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com