Rupali Chakankar News : राज्य महिला आयाेगाच्या माध्यमातून विभक्त होणारे कुटुंब जोडल्याचा आनंद : रुपाली चाकणकर

rajya mahila aayog meeting held in satara : डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलींच्या मोठ्या प्रमाणात फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत. मुलींची छेडछाड होत असल्यास आयोगाच्या 1091 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले.
249 womens cases solved by rajya mahila aayog in satara says rupali chakankar
249 womens cases solved by rajya mahila aayog in satara says rupali chakankarSaam Digital
Published On

महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी. तक्रारींची राज्य महिला आयोग सोडवणूक करुन पिडीतांचे जीवन सुखमय होण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. दरम्यान आज साता-यात विभक्त हाेणा-या कुटुंबाचे समुपदेशन करुन कुटुंब जाेडल्याचा आनंद हाेत असल्याचे चाकणकर यांनी नमूद केले.

249 womens cases solved by rajya mahila aayog in satara says rupali chakankar
Kolhapur News : शौमिका महाडिकांचा प्रस्ताव सतेज पाटील स्विकारणार का?

महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई आयोजित महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. चाकणकर यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नांवर जनसुनावणी झाली. यावेळी 249 हुन अधिक महिलांच्या समस्यांचे निराकारण करण्याचा प्रयत्न केल्याचे चाकणकर यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी देखील महिलांचे प्रश्न समजावून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

249 womens cases solved by rajya mahila aayog in satara says rupali chakankar
Kalyan Dombivli Local Train: दिव्यांगाच्या डब्यात धडधाकट प्रवाशांची घुसखोरी; उभे राहण्यासही जागा नाही, Video आला समोर

चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.

वारीमध्ये राज्य महिला आयोगाकडून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. यामध्ये वारी मार्गावर दीड ते दोन किलो मीटर अंतराव महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन पुरवले जातात. सातारा जिल्हा प्रशासनाने वारीमधील महिलांसाठी विविध सोयी सुविधा पुरविल्या आहेत. याबद्दल चाकणकर यांनी समाधानही व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

249 womens cases solved by rajya mahila aayog in satara says rupali chakankar
Maharashtra Milk Price Issue: शब्द पाळा अन्यथा पायउतार व्हा, डाॅ. अजित नवलेंचे राधाकृष्ण विखे पाटलांना आवाहन; दूधदरासाठी उद्यापासून राज्यभर आंदाेलन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com