Sangli: वादळी वाऱ्याने दाेनशे विद्युत खांब पडले, 8 दिवसांपासून जतचा पूर्व भाग अंधारात

Nearly 200 electricity poles damaged in jat : आमच्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे ग्रामस्थांनी हभप तुकाराम बाबा महाराज यांना सांगितले. त्यानंतर हभप तुकाराम बाबा महाराज यांनी संख महावितरण कार्यालय गाठत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
200 electricity poles damaged in jat sangli
200 electricity poles damaged in jat sangliSaam Digital
Published On

सांगलीच्या जत तालुक्यात वादळी वाऱ्याने खाजगी व शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचे तब्बल 200 खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे. वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे. तेथेसुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संख महावितरण समोर आहे.

जत पूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्वरत करावा यासाठी अन्य तालुके व जिल्ह्यातून अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे. हभप तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या.

200 electricity poles damaged in jat sangli
काेल्हापुरात शेतक-यांचा माेर्चा, तुघलकी निर्णय मागे घ्या अन्यथा 6 जूननंतर आंदाेलनाची तीव्रता वाढविणार; सरकारला इशारा

या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला. आठ दिवस झाले लाईट गायब आहे, हाल सुरू आहेत अशा तक्रारी केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी जत पूर्व भागात २०० हुन अधिक पोल वादळी वाऱ्याने कोलमडून पडले आहेत. प्रथम मेन लाइनचे पोल उभा केले जात आहेत. ते होताच अन्य पोल उभे केले जातील.कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने वेळ लागत असल्याचे हभप तुकाराम बाबा महाराज यांना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

200 electricity poles damaged in jat sangli
30 हजार रुपयांच्या रिक्षाला ठाेठावला गेला सव्वा लाखाचा दंड, RTO राबविणार राज्यभरात माेहिम; जाणून घ्या उच्च न्यायालयाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com