
पालकांनो तुमची मुले रस्त्यावर खेळत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. बऱ्याचदा मुलं खेळता खेळता पालकांचा डोळा चुकवून रस्त्यावर जातात आणि अपघाताला सामोरे जातात. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकच्या अंबड परिसरात शुक्रवारी घडली. २ वर्षांचा चिमुकला पालकांची नजर चुकवून रस्त्यावर खेळत असताना मागून येणाऱ्या रिक्षाची धडक त्याला बसली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा अंत झाला.याप्रकरणी पोलिस तपास करत आहे. रिक्षा चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या आझाद नगर अंबड येथे २ वर्षीय अदनान फिरोज शेख याचा रिक्षाच्या धडकेत काल शुक्रवारी मृत्यू झाला. घरच्या समोर खेळत असताना रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने चिमुकल्याला उडवले. रिक्षाच्या धडकेत अदनान गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना चिमुकल्याचा मृत्यू झाला. रिक्षा चालक अखिलेश यादव वर्षे ४४ याच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरीकांनी रिक्षा चालकाला पकडून चोप दिला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरीष्ठ निरीक्षक मधुकर कड यांचे पथक याप्रकरणी तपास करत आहे.
नांदेड मधून देखील धक्कादायक घटना समोर आली आहे. सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षीय विद्यार्थ्याचा वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. आनंदनगर भागात वानखेडे हॉस्टेलमध्ये शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
आनंदनगर भागात वानखेडे हॉस्टेल आणि कोचिंग क्लासेस आहेत. याच हॉस्टेलचा वैभव हा विद्यार्थी होता. तो सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आठ दिवसापूर्वी कुटुंबियांनी त्याला शिक्षणासाठी आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेल येथे दाखल केले होते. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. त्यानंतर तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पायऱ्यावरुन पाय घसरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं आहे. या प्रकरणी विमानातळ पोलिसांकडून तपास सुरु आहे.
दरम्यान, १२ वर्षाच्या वैभवचा पडून नेमका मृत्यू कसा झाला? याचा अधिकचा तपास पोलिस घेत आहेत. याबाबतची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, पायऱ्यावरुन पाय घसरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं असले तरी पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.