Baramati News: बारामती (Baramati) येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडील दोघांवरही दुखा:चा मोठा डोंगर कोसळला आहे. तसेच डॉक्टरांच्या चुकीमुळे आमच्या मुलाचा जीव गेल्याचा तगादा त्याच्या वडीलांनी लावला आहे. डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अक्षय साधू धुमाळ या मुलाचा सर्पदंशाने (snake bite) मृत्यू झाला. फलटण तालुक्याच्या गोखळ गावचा तो रहिवासी होता. तसेच यंदा तो ११ वीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी तो शेतात गवत आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका विषारी सापाने त्याच्या पायाला दंश केला.
एकुलत्या एक मुलाला साप चावल्याने आई-वडील त्याचा जीव वाचवण्यासाठी व्याकूळ झाले. त्यांनी प्रथम त्याला सिल्वर जुबली रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच्या प्रकृतीचा अंदाज घेत महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टर देखील त्याच्यावर उपचार करण्यास असक्षम होते. त्यामुळे रात्री त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले गेले.
मुलाच्या प्रेमापोटी वडीलांनी रात्री १२ वाजता ससून रुग्णालय गाठले. यात अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांची खूप हेळसांड झाली. ससूनमध्ये दाखल केल्यावर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याची प्रकृती स्थिरावर येत नव्हती. अखेर आज, रविवारी त्याची प्राणज्योत मालवली.
मुलाच्या निधनाने त्याचे आई-वडील खचून गेले आहेत. एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांना दुख: अनावर झाले आहे. तसेच वडिलांनी मुलाच्या मृत्यूसाठी डॉक्टरांना जबाबदार ठरवले आहे. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी उपचारात खूप दिरंगाई केली असा आरोप साधु धुमाळ यांनी केला आहे. तसेच आता मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे. डॉक्टरांवर योग्य ती कारवाई केल्यावरच मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार या मतावर कुटुंबीय ठाम आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.