Optical illusion : 'या' चित्रात 30 सेकंदात साप शोधून दाखवा; 99 टक्के लोक फेल

या फोटोत एक साप लपला आहे आणि तो 30 सेकंदात तुम्हाला शोधायचा आहे.
Optical illusion
Optical illusionSaam Tv
Published On

Optical Illusion News In Marathi: सोशल मीडियावर (Social Media) ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल (Viral Photo) होत असतात. या फोटोंमध्ये अनेक प्राणी, पक्षी, मानवी आकार किंवा वस्तू लपलेल्या असतात. यातील काही फोटो आपल्याला कन्फ्यूज करतात तर काही फोटो आपल्या व्यक्तीत्वाबाबत खुलासा करतात. 

पण काही फोटो ऑप्टिकल इल्युजन असे असतात जे बघून डोकं चक्रावून जातं. अशाच एक हैराण करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात काही पक्षी झाडांवर आणि रोपांवर बसले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक साप लपला आहे. साप कुठे लपला आहे ते शोधावे लागेल.

Optical illusion
'साजिद खानवर सलमानचा हात, कोणीही काही बिघडवू शकत नाही'; शर्लिन चोप्राकडून लैंगिक छळाची तक्रार, मीडियासमोर ढसाढसा रडली

हिरवा रंग वापरून बनवलेल्या या पेंटिंगमध्ये केवळ झाडे आणि पक्षीच दिसत आहेत असे दिसत आहे मात्र या चित्रात एक सापही आहे. थोडा विचार केल्यानंतर तुम्हाला तो नक्की सापडू शकतो. या ऑप्टिकल इल्यूजनने आपल्या आयक्यू टेस्टही होते. फक्त त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असायला हवी.

जर तुम्ही फोटो नीट बघितलात तर तुम्हालाही हे कोडे सोडवण्यात यश येईल. फक्त तुमचे सर्व लक्ष फोटोकडे व्यवस्थित ठेवा आणि पाहात रहा. जर तुम्हाला साप सापडला, तर तुमचं अभिनंदन. तुमचा समावेशही बुद्धिमत्ता असलेल्या लोकांच्या यादीत समावेश झाला आहात. पण जर तुम्हाला साप दिसला नसेल तर खाली दिलेला फोटो बघा.

जाणून घ्या बरोबर उत्तर काय आहे

या चित्राच्या डाव्या बाजूला जे काळे वर्तुळ बनवले आहे, त्याच्या शेजारी साप आहे. गंमत म्हणजे सापाचा रंगही हिरवा आहे. नीट पाहिल्यानंतर साप कुठे आहे हे नक्की कळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com