National Bravery Award : चार वर्षाच्या भावास वाचविणा-या महाराष्ट्रातील 'लक्ष्मी' ला बाल शौर्य पुरस्कार; वाचा थरारक घटना

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत लक्ष्मीला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
laxmi yedlewar, nanded, National Bravery Award
laxmi yedlewar, nanded, National Bravery Awardsaam tv
Published On

Nanded Laxmi Yedlewar : स्वतःचा जीव धोक्यात घालून विजेच्या तारेला चिकटलेल्या भावाला वाचविण्या-या बहिणीचा यंदा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी (National Bravery Award) निवड झाली. नांदेड जिल्ह्य़ातील बिलोली तालुक्यातील थडीसावळी येथील लक्ष्मी येडलेवार (laxmi yedlewar) असे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मुलीचे नाव. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हा पुरस्कार (award) लक्ष्मीला प्रदान करण्यात येणार आहे.

laxmi yedlewar, nanded, National Bravery Award
Gadchiroli News : वेडमपल्ली जंगलात पाेलिसांचा धमाका; शस्त्र टाकून नक्षलवाद्यांनी काढला पळ

सन 2021 कालावधीत थडीसावळी (nanded) येथे लक्ष्मी घरात अभ्यास करत असताना चुलत भाऊ आदित्यचा (वय चार) ओरडण्याचा आवाज आला. लक्ष्मीने बाहेर येऊन पाहिले तर आदित्य हा विजेच्या तारेला चिकटलेला दिसला. लक्ष्मीने धाडस दाखवत लाकडाच्या सहाय्याने आदित्यला बाजूला केले मात्र, लक्ष्मीला तारेला स्पर्श झाल्याने ती बेशुद्ध पडली.

laxmi yedlewar, nanded, National Bravery Award
Ravikant Tupkar: कापसाला 'हा' भाव द्या, अन्यथा आंदाेलनास सामाेरे जा : रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

त्यानंतर तिच्यावर आणि आदित्यवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या दोघांचा ही जीव वाचला. लक्ष्मीने दाखविलेल्या धाडसाची चर्चा गावभर पसरली हाेती. ग्रामपंचायतीच्या वतीने तिचा सत्कार देखील करण्यात आला. (Maharashtra News)

laxmi yedlewar, nanded, National Bravery Award
Makar Sankranti 2023 : पतंगोत्सवाला गालबाेट, नायलॉन मांजाने कापला गळा; जखमी रुग्णालयात दाखल

लक्ष्मीने जिवाची बाजी लावून लहान चुलत भावाचा जीव वाचवला. केंद्र सरकारने लक्ष्मीच्या धाडसाची दखल घेत तिची बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. तिला प्रजासत्ताक दिनी दिल्लीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लक्ष्मीला मिळालेल्या पुरस्काराने तिच्या पालकांसह पंचक्रोशीत आनंद व्यक्त केला जात आहे. तिचे वडील आनंदराव यांनी तिच्या धाडसामुळे भावाचा जीव वाचला असे सांगताना लक्ष्मीला पुरस्कार मिळाल्याने आनंद झाल्याचे म्हटलं.

laxmi yedlewar, nanded, National Bravery Award
Sikander Shaikh News: सिकंदरवर अन्याय झाला सांगताना रशिद खानांचा अश्रूंचा फुटला बांध; ज्याने चूक केली त्याने...,

लक्ष्मीने दाखविलेल्या धाडसाची देशपातळीवर दखल घेतली गेली. लक्ष्मीने भावाला वाचविण्यासाठी दाखविलेल्या धाडस इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत जयराम भंडारे (ज्येष्ठ नागरिक) यांच्यासह ग्रामस्थांनी (villagers) व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com