बुलढाणा - गेल्या वर्षभरापासून लहान मुलं ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईलच्या विळख्यात किती भयानाकतेने अडकली आहे. याचा प्रत्यय बुलढाण्यातील मलकापूरमध्ये आला आहे. एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून ऑनलाइन शिक्षणामुळे वर्षभरात ऑनलाइन गेमच्या नादात घरा बाहेर पडली आणि नंतर जे झाल ते तुम्हा आम्हाला व विशेषतः महिलांना जागृत करणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील एक आठवीत शिकणारी १३ वर्षीय मुलगी. गेल्या वर्षभरापासून शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने. आईच्याच मोबाईलवर ही मुलगी ऑनलाइन शिक्षण घेत होती. बाहेर लॉकडाउन आणि त्यामुळे कुठे खेळायलाही जाता येत नव्हत. म्हणून मुलीने एक ऑनलाइन गेम डाउनलोड केला ."फ्री फायर" या ऑनलाइन गेमच्या नादात चक्क घरून निघून गेली ती सापडली चक्क १५८० किलोमीटर दूर असलेल्या झारखंड. राज्यातील ऑनलाइन फ्रॉड साठी प्रसिद्ध असलेल्या जामतारा या भागात.
हे देखील पहा -
२७ नोव्हेंबर २०२१ रोजी मलकापूर शहरातील एक १३ वर्षीय मुलगी ऑनलाईन गेम खेळत असताना ऑनलाईन असलेल्या मित्रांच्या नादात ती मलकापूर येथून गायब झाली होती. ती नेहमी ऑनलाइन गेम खेळत असताना अनेक अनोळखी मित्रांशी तिची ओळख झाली. अनेक अनोळखी फ्रेड रिक्वेस्ट तिने एक्सेप्ट केल्या. अशातच बिहार आणि झारखंड मधील जामतारा येथील दोघे जणांनी तिचा मोबाईल हॅक करून तिला धमक्या देऊन थेट मलकापूर येथे येऊन त्यांनी तिला मलकापूर हुन भुसावळ येथून रेल्वेने सुरुवातीला पाटणा व तेथून झारखंडच्या जामतारा भागातील अहिल्यापुर येथे नेलं.
यावेळी त्याभागात पोलिसांचं नक्सली विरुद्ध कोंबिंग ऑपरेशन सुरू होत. त्यात ते दोघे व ही मुलगी अडकली. पोलिसांनी खाक्या दाखवताच सर्व उघड झाले आणि नशीब बलवत्तर म्हणून ही मुलगी झारखंड पोलिसांच्या हाती लागली व तिची सुखरूप सुटका झाली. तिच्या या सुटकेची भयानक आणि तितकीच रोचक कहाणी थक्क करणारी आहे. बुलढाणा जिल्ह्यातून वर्षभरात अधिकृतरीत्या २०० हुन अधिक महिला ,तरुणी बेपत्ता आहेत आता त्यांच्या भवितव्य काय असेल या घटनेवरून अधोरेखित झालं आहे.
या मुलीची सुखरूप सुटका तर झाली पण अशा अनेक मुली अध्याप बेपता आहे.मुलीच्या वडिलांनी झारखंड ला मलकापूर पोलीस पथकासोबत जाऊन आपल्या मुलीला तर आणले पण अध्याप अशा अनेक मुली गायब आहेत त्यांच्या भविष्याची चिंता या मुलीच्या पालकांना आता सतावत आहे त्यामुळे त्यांनी त्यांची मानसिकता नसतांना व प्रवासाचा थकवा असताना पोलिसांनीही अवहान केलं आहे. तसेच या घटनेतील दोन आरोपीना अहिल्यापुर झारखंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.