तीन महिने मोबाईल रिचार्ज केला, तरीही 'ती' सोडून गेली (पहा व्हिडिओ)

ब्रेकअपनंतरचा प्रियकराचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
तीन महिने मोबाईल रिचार्ज केला, तरीही 'ती' सोडून गेली (पहा व्हिडिओ)
तीन महिने मोबाईल रिचार्ज केला, तरीही 'ती' सोडून गेली (पहा व्हिडिओ)Saam Tv
Published On

मुंबई - आतापर्यंत ब्रेकअपचे अनेक व्हिडीओ (Viral Video) तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कुठे प्रियकर प्रेयसी ब्रेकअप दरम्यान रडताना दिसतात, तर कुणी भांडताना दिसतात. ब्रेकअपनंतर (Breakup) मुव्ह ऑन करणे तसे सोपे नसेत. पण, काही जण ते सहज करतात, तर काही आपल्या प्रियकर-प्रेयसीच्या आठवणींमध्ये वर्षोंवर्षे हरवलेले असतात. काही लोकांसाठी, त्यांच्या प्रेयसीशिवाय जगणे कठीण होऊन बसते. हे जरी वाचायला अत्यंत हृदयद्रावक वाटत असलं तरी यासंबंधीचे व्हिडीओ पाहाताना आपल्याला हसू आवरत नाही. ब्रेकअप झालेली व्यक्ती जेव्हा त्याची व्यथा आपल्यापुढे मांडत असते तेव्हाही अनेकांना ते मजेशीर वाटते, म्हणून याचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

हे देखील पहा -

ब्रेकअप झालेल्या या तरुणाची व्यथा ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर सध्या ब्रेकअपचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये प्रियकर सांगत असलेली त्याची व्यथा आणि त्याचे शब्द ऐकून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडीओमध्ये एक प्रियकर त्याच्या प्रेयसीबद्दल सांगत आहे, जिने त्याच्याशी ब्रेकअप केलं आहे. प्रेयसीबद्दलच्या गोष्टी सांगताना प्रियकराचे दु:ख पाहून तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही हे मात्र नक्की.

हा मजेशीर व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सच्या तो अत्यंत पसंतीस पडत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की प्रियकर आपल्या वेदना एका रिपोर्टरसोबत शेअर करत आहे. प्रियकर रिपोर्टरला त्याच्या अयशस्वी प्रेमकथेबद्दल सांगत आहे. या प्रियकराने सांगितलं की प्रेयसी त्याच्याकडे पैसे मागत होती, यावरुन त्यांच्यात भांडण झाले आणि त्याने प्रेयसीला सोडले. तो अजूनही तिला विसरलेला नाही, असंही तो या व्हिडीओत सांगतोय.

पाहा हा मजेशीर व्हिडीओ

प्रेयसीचा मोबाईल रिचार्ज करायचा तरीही सोडून गेली

यापुढे प्रियकर सांगतो की गेल्या तीन महिन्यांपासून तो प्रेयसीचा मोबाईल रिचार्ज करत होता. यानंतरही ती सोडून निघून गेली. दरम्यान, रिपोर्टरने विचारले, 'तुझी प्रेयसी गेल्याचे तुला दु:ख आहे का? यावर प्रियकर अत्यंत वेदनादायी स्वरात सांगतो- भावा, ती फक्त प्रेयसी नव्हती, त्याहून अधिक होती माझ्यासाठी, माझं घर माझ्यापासून वेगळं झालंय, मी उद्ध्वस्त झालोय'. ब्रेकअपच्या दु:खात बुडालेल्या या प्रियकराचा व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसल्याशिवाय राहणार नाही.

Edited By - Noopur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com