Solapur News: दिव्यांग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या १० वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कर न करण्याची कुटुंबीयांची भूमिका

जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.
Solapur News
Solapur Newsविश्वभूषण लिमये, सोलापूर
Published On

Solapur News: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिव्यांग निधीसाठी उपोषण करताना एका १० वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून चिखर्डे येथील रामचंद्र कुरुळे स्मशानभूमीत उपोषणाला बसले होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब अपंग असल्याने अपंग निधीसाठी त्यांनी उपोषण केले. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मुलाला काल रिववार (४ डिसेंबर) आपला जीव गमवावा लागला. संभव कुरुळे (वय वर्षे १०) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याच्या निधनाने कुटुंबीयांना शोक अनावर झाला आहे.

स्मशानभूमीत कुरुळे कुटुंबीयांचे उपोषण (Hunger strike) सुरू होते. अशात मुलाचा तिथेच मृत्यू झाल्याने त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार न करता शव घरी आणले. तसेच न्याय न मिळाल्यास मुलाचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणार असे कुरुळे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अपंग निधीसाठी त्यांनी या आधी देखील उपोषण केले होते. मात्र तेव्हा शासनाने फक्त त्यांना अश्वासने दिली.

Solapur News
Solapur Wedding: दोन बायका फजिती ऐका; जुळ्या बहिणींचा एकाच तरुणाशी विवाह, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिला 'आहेर'

उपोषणामुळे याआधी मुलीलाही गमावले

कुरुळे कुटुंबीयांनी याआधी ऑगस्ट महिन्यात दिव्यांग निधीसाठी उपोषण केले होते. त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. यात त्यांच्या १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. वैष्षवी कुरुळे असे मृत मुलीचे नाव आहे. मुलीचा मृत्यू झाला तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू आणि रखडलेला निधी देखील १५ दिवसांत मिळवून देऊ असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे कुंटुंबीयांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

Solapur News
Solapur News: विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे, काळ्या म्हशीनं चक्क पांढऱ्या शुभ्र रेडकूला दिला जन्म; दुर्मिळ दृश्य पाहायला सारं गाव जमलं

निधी मिळेल या आशेवर त्यांनी काही दिवस वाट पाहिली. मात्र १५ दिवस उलटूनही निधी हातात न मिळाल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. यात काल त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. आधी १३ वर्षीय मुलगी आणि आता १० वर्षांचा मुलगा गमावल्याने रामचंद्र कुरुळे आणि त्यांच्या पत्नीला शोक अनावर झाला आहे. तसेच या वेळी न्याय मिळाल्याशिवाय मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com