Gondia Car Accident: गोंदियामध्ये भीषण अपघात, कारचा झाला चक्काचूर; एकाचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी

Gondia Police: गोंदिया - कोहमारा मार्गावर हा भीषण अपघात झाला.
Gondia Car Accident
Gondia Car AccidentSaam Tv

Gandia News: गोंदियामध्ये भरधाव कारला भीषण अपघात (Gondia Car Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गोंदिया - कोहमारा मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघाताचा तपास गोंदिया पोलिसांकडून (Gondia Police) सुरु आहे.

Gondia Car Accident
NEET 2023: नीट परीक्षा काळात सांगलीत विद्यार्थिनींशी गैरवर्तन; अंतर्वस्त्र काढा, कपडे उलट घाला, पालकांची NTA कडे धाव (पाहा व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियावरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला भीषण अपघात झाला. गोंदिया-कोहमारा मार्गावरील भुसारीटोलाजवळ ही घटना घडली. या अपघातामध्ये 24 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला. महमद शेख असे मृत चालकाचे नाव आहे. तर या अपघातामध्ये कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Gondia Car Accident
DRDO Espionage Case: प्रदीप कुरुलकरसह अन्य एक अधिकारी हॅनी ट्रॅपमध्ये अडकला, ATS ने व्यक्त केला संशय

भुसारीटोलाजवळ ही भरधाव कार अनियंत्रित झाली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर ती झाडाला जाऊन धडकली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने सांगितली आहे. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अपघातातील जखमीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघाताचा तपास गोंदिया पोलिसांकडून सुरु आहे.

दरम्यान, बुलडाण्यामध्ये प्रवासी बसला रात्री उशिरा अपघात झाला. शेगाववरुन पुण्याला जाण्यासाठी निघालेली ही बसला पैनगंगा नदीत कोसळली. चिखली रोडवरील पेठजवळ ही घटना घडली. पेठ या गावाजवळ पैनगंगा नदीच्या पुलावरून बस खाली कोसळली. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू तर 17 जण जखमी झालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com