Maharashtra Politics: 'मातोश्री'च्या अंगणात गुलाल कोण उधळणार? Special Report

Maharashtra Political News: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. वांद्रे पूर्ण मतदारसंघात वरुण सरदेसाई विरुद्धान झिशान सिद्दिकी अशी लढत होणार आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

संजय गडदे

महाविकास आघाडी महायुतीत होणार थेट लढत

राज्यात सर्वात जास्त चर्चिला जाणारा मतदारसंघ म्हणून यंदा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे पहिले जात आहेत. याच मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरूण सरदेसाई हे महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिकिटावर मैदानात उतरले आहेत तर महायुतीकडून विद्यमान आमदार झिषान सिद्धीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मैदानात उतरले आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी याच मतदारसंघातून नारायण राणे यांचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यादेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिकिटावर मैदानात उतरले आहेत त्यामुळे येथे जरी प्रमुख तीन पक्ष मैदानात असले तरी लढत मात्र थेट शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्येच होणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री अंगण म्हणून वांद्रे मतदार संघाची ओळख आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वांद्रे पूर्व ची जागा जिंकण्याचा निर्धार शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे यामुळे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता वांद्रे पूर्वतील मतदारांसोबत राजकीय विश्लेषकांना देखील लागली आहे

मराठी आणि मुस्लिम बहुल मतदार असणारा हा वांद्रे पूर्व मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो हिंदूहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे शिवसैनिक बाळा सावंत यांच्या रूपाने 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेचा हा बालेकिल्ला अबाधित राखला मात्र बाळा सावंत यांच्या निधनानंतर 2015 मध्ये या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आले मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षावरील रागातून नारायण राणे यांनी ती पोट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मात्र या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांनी एक हाती विजय मिळवला.

Maharashtra Politics
Nandurbar Politics: नंदुरबारमध्ये गावित कुटुंबाचा बोलबाला; एकाच जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ४ सदस्य रिंगणात

2019 विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचे तिकीट कापून विभाग प्रमुख अनिल परब यांचे अत्यंत जवळचे असणारे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना संधी देण्यात आली आणि तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात गेला आणि त्या ठिकाणी झिषान सिद्धीकी आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासूनच वांद्रे पूर्व विधानसभा पुन्हा आपल्या ताब्यात यावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चंग बांधण्यात आला झिषान सिद्दिकी याला डावलून येथे आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरूण सरदेसाई याला उमेदवारी देण्यात आली. मात्र शिवसेना ठाकरे गटासाठी ही जागा जिंकणे म्हणजे तगड आव्हानच आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: सत्तेची दोरी ओबीसींच्या हाती; मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

झिषान सिद्दिकी यांनी आमदार म्हणून मागील पाच वर्षात केलेली विकास कामे आणि बांधलेले तरुणांचे संघटन पाहता झिषान सिद्दिकी हे वरूण सरदेसाई यांना टक्कर देऊ शकतात असाच काही सासुर वांद्रे पूर्व विधानसभेतील मतदार अळवताना दिसून येत आहेत. शिवाय स्वर्गीय बाळासाहेब यांना मानणारा मोठा वर्ग देखील या ठिकाणी आहे त्याचा फायदा यावेळी मनसे मधून उमेदवारी मिळवलेल्या तृप्ती सावंत यांना किती होईल हे सांगणे जरी कठीण असले तरी तृप्ती सावंत यांना कमजोर लेखणे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांना परवडणारे नाही

तृप्ती सावंत यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज अखिल चित्रे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

मागील 18 वर्षापासून मनसे पक्षात विद्यार्थी सेनेचे काम करणाऱ्या अखिल चित्रे यांनी 2019 ची निवडणूक लढवली होती या निवडणुकीत चित्रे यांना दहा हजार सहाशे इतके मतदान देखील झाले होते मात्र यावेळी अखिल चित्रे यांचा पत्ता कट करून तृप्ती सावंत यांना मनसेने उमेदवारी दिल्यामुळे चित्रे नाराज झाले आणि शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला वांद्रे पूर्व परिसरात चित्रे यांनी मनसे पक्ष वाढवत असताना स्वतःचा एक वेगळा गट देखील तयार केला आता बाहेरचा आयात उमेदवार दिल्यामुळे चित्रे यांच्या सोबतच त्यांचे समर्थक देखील नाराज आहेत त्यामुळे तृप्ती सावंत यांना मनसे पदाधिकारी किती साथ देतील हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंनी दिला भिवंडीत झटका; माजी आमदारासह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत

महायुतीत बंडखोरी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निषानसिद्धी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वांद्रे पूर्व मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कुणाल सरमळकर यांनी या ठिकाणावरून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वांद्रे पूर्व मतदार संघात जवळपास दोन लाख 47 हजार 639 इतके मतदार आहेत यातील जवळपास एक लाख मराठी तर 80 हजाराहून अधिक मुस्लिम मतदार आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी मराठी चेहरा मैदानात उतरवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम चेहरा मैदानात उतरवला आहे त्यामुळे या ठिकाणी मराठी मतांचे विभाजन व्हावे यासाठी कुणाल सरमाळकर यांना बंडखोरी करायला लावण्यात आली असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे लोकसभा निवडणुकीत या ठिकाणावरून वर्षा गायकवाड यांना मोठे मताधिक्य मिळाले होते यावेळी मराठी आणि मुस्लिम मतांमध्ये विभाजन होऊ शकते असा राजकीय विश्लेषकांचा देखील अंदाज आहे मात्र लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेली मते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अधिक मते घेऊ शकतो असेही राजकीय विश्लेषकांचे माननीय आहे.

2019 मध्ये मिळालेली मते

झिषान सिद्दिकी काँग्रेस. 38337

विश्वनाथ महाडेश्वर शिवसेना 32547

तृप्ती सावंत अपक्ष 24071

मोहम्मद कुरेशी एमआयएम. 12594

अखिल चित्रे मनसे 10683

2014 निवडणुकीत मिळालेली मते

बाळा सावंत शिवसेना 41388

कृष्णा पारकर बीजेपी 25,791

रहेबर सिराज खान एमआयएम 23976

संजीव बागडी काँग्रेस 12229

शिल्पा सरपोतदार मनसे 5401

Maharashtra Politics
Nandurbar Politics: नंदुरबारमध्ये गावित कुटुंबाचा बोलबाला; एकाच जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ४ सदस्य रिंगणात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com