Anushakti Nagar : पवार-ठाकरेंकडून मतदारसंघाची आदलाबदल, मुंबईच्या बदल्यात पश्चिम महाराष्टातील मतदारसंघ सोडणार!

Maharashtra politics : शरद पवार आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील मतदारसंघाची आदलाबदल होणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024: मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहचल्याचे समजतेय. काही जांगावर तिढा आहे, ते सोडवण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून करत आहेत. ज्या पक्षाची ताकद जास्त, त्याला तो मतदारसंघ असे गणित मांडण्यात येत आहे. त्यामुळे काही जागांची आदलाबदल होणार, हेही तितकेच खरे आहे. संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी याआधी तसे संकेतही दिले होते. आता मुंबईतील मतदारसंघाच्या बदल्यात ठाकरे पवारांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ सोडणार असल्याचे समोर आले आहे. होय.. शरद पवार यांचा मुंबईतील अणुशक्ती नगर मतदारसंघ ठाकरेंना मिळणार असल्याचे समोर आले आहे. (anushakti nagar assembly constituency)

मुंबईतील अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याच अदला बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अणुशक्ती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे प्रबळ उमेदवार नसल्यामुळे हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाच्या बदल्यात पश्चिम महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे. तो कोणता मतदारसंघ असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. करमाळा मतदारसंघ ठाकरे सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याबदल्यात ठाकरेंना अणुशक्तीनगर हा मतदारसंघा मिळेल. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि उपविभाग प्रमुख अरुण हुले यांची प्रबळ दावेदारी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com