Maharashtra Politics : ठाकरेंना जागा का दिली? साताऱ्यात दीपक पवारांचे बंडाचे निशाण, मविआमध्ये मिठाचा खडा

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक असणारे उमेदवार दीपक पवार कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार आहेत.
Maharashtra Politics
Uddhav Thackeray Saam Tv
Published On

ओंकार कदम, सातारा प्रतिनिधी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पण महायुती आणि मविआमध्ये अद्याप नाराजांचे बंड काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीत. साताऱ्यातही बंडखोरीची शक्यता आहे. याचा फटका मविआला बसणार आहे. दीपक पवार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मविआच्या अडचणी वाढल्या.

सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये आता मीठाचा खडा पडला आहे. या मतदारसंघातून गेल्या वेळी शिवेंद्रराजे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते दीपक पवार यांना उमेदवारी डावलून हा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाला सोडल्याने आणि सध्या अजित पवार गटांमध्ये असलेले अमित कदम यांना उमेदवारी दिल्याने दीपक पवार व त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. या उमेदवाराचे आम्ही काम करणार नाही अशी स्पष्ट भूमिका दीपक पवार यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घेतली आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Rain News : राज्यात आजपासून पावसाची शक्यता; पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही बरसणार!

यावेळी बोलत असताना दीपक पवार म्हणाले, कोणत्या निकषांवर ही सातारची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिली. हा मला व मा‍झ्या कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे. मी माझ्याकडे भारतीय जनता पार्टीने पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ दिलं असताना मंत्रीपदाचा दर्जा असताना राजीनामा देऊन हा पक्ष सोडला आणि पवार साहेबांबरोबर गेलो. मागील निवडणुकीमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात मी 78 हजार एवढे मतदान घेतले आहे. त्यावेळी मी एकटा लढलो राष्ट्रवादीचे सदस्य सुद्धा भाजपच्या स्टेजवर होते. त्यानंतर पाच वर्ष काम करून मी या मतदारसंघात पक्ष संघटना वाढवली. एका महिन्यात तीन पक्ष बदलून आलेल्या माणसाला शिवसेनेने या विधानसभेत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अशा माणसाचं आम्ही काम कसं करायचं? हा माझ्यापुढे प्रश्न आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Election : 2 जागा, एक कॅबिनेट मंत्रिपद, ४ महामंडळ अध्यक्षपद; महायुतीकडून रामदास आठवलेंची नाराजी दूर?

माझ्या कार्यकर्त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे, आपण या उमेदवाराचा काम करायचं नाही. चार तारखेला आमच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊन मी पुढील निर्णय घेणार आहे. अर्ज भरण्यासाठी सुद्धा मी आणि माझे कार्यकर्ते जाणार नाही. पक्षावर आमची निष्ठा असून आमचा विचार केला गेला नाही. शंभर टक्के जिल्ह्यात महाविकास आघाडीचे जागावाटप चुकीचे झाले आहे, त्यामुळे हा पक्षाला मोठा घात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com