Sanjay Raut News : संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा, म्हणाले आमच्याकडूनही तशी चूक होईल

Maharashtra Solapur News : सोलापूर दक्षिण मतदारसंघावरुन काँग्रेस आणि शिवसेना आमनेसामने
Sanjay Raut
Sanjay Raut Saam Digital
Published On

Sanjay Raut Warns Congress Party Solapur Maharashtra : दक्षिण सोलापूरवरुन काँग्रेस आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये ठाकरे आणि काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला. शिवसेना सोलापूर दक्षिण उमेदवार मागे घेईल, अशी काँग्रेसला अपेक्षा होती. पण संजय राऊत यांनी दक्षिण सोलापूरमधून माघार न घेण्याचे संकेत देत इशारा दिलाय. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने उमेदवार दिला. माझ्या मते ती टायपिंग मिस्टेक असेल. अशी मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकते, असा इशारा संजय राऊत यांनी काँग्रेसला दिलाय.

तिकीट मिळाले नाही, तर कुणी ना कुणी नाराज होतोच. संजय राऊत यांनी जागाबाबत विषय संपवायला पाहिजे. त्यांनी विरोधाकांवर बोलावं, असा माझा त्यांना सल्ला आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले.

परांडा, मिरज, दक्षिण सोलापूर ठिकाणी महाविकास आघाडीवचे दोन उमेदवार आहेत. या ठिकाणी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मागे न घेता जागा लढवण्याचे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांचे स्पष्ट संकेत. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी तिन्ही ठिकाणी लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले ?

सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने उमेदवार दिला. माझ्या मते ती टायपिंग मिस्टेक असेल. अशी मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकते.

परांडा मतदारसंघाबाबत संभ्रम आहे, तोडगा निघेल.

दिग्रसमध्ये आमचा उमेदवार दिसणार नाही. माणिकराव ठाकरेंसाठी जागा सोडली आहे.

मुंबईमध्ये आणखी एखादी जागा मिळावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. मुंबईत सर्वात कमी जाग शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत.

मिरजेचे लोक काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.

आमचा महाराष्ट्राचा चेहरा उद्धव ठाकरे, आम्ही स्टँड घेतलाय. काँग्रेसला चेहरा ठरवण्यासाठी हायकमांडला विचारावे लागेल.

शिवसेनेचे चिन्ह गोठवून मैदानात या. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिले आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com