Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात यंदा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. काँग्रेसकडून विश्वजीत कदम रिंगणात होते. तर भाजपकडून संग्राम देशमुख रिंगणात होते. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, विश्वजीत कदम विजयी होण्याची शक्यता आहे.
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोलनुसार, विश्वजीत कदम आघाडीवर तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात तीन टर्म काँग्रेसची सत्ता आहे. यंदाही काँग्रेसच बाजी मारत असल्याचं दिसत आहे.
या मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वजीत कदम यांच्यावर विश्वास दाखवला होता. विश्वजीत कदम यांच्या विरोधात भाजपकडून संग्राम देशमुख रिंगणात होते. मागील वेळी देखील संग्राम देशमुख रिंगणात होते. विश्वजीत कदम यांची कामे आणि संस्था यामुळे मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसचे विश्वजीत कदम विजयी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.