Maharashtra Assembly Election : मुंडे बहीण भावांनी घेतली अजित पवारांची भेट, बीडमधील राजकारण तापले!

Ajit Pawar News : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांची भेट घेतली.

Pankaja Munde News : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच, पुन्हा एकदा बीडमधील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून रणनिती आखली जात आहे. उमेदवाराच्या निवडीवर बैठका सुरु आहेत. सोमवारी रात्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. रात्रीच्या दरम्यान मुंडे बहीण भावांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील विविध उमेदवारीवरून भेट घेतल्याची सूत्रांनी सांगितले. डॉ. योगेश क्षीरसागर यांची बीड विधानसभा उमेदवारीसाठी लॉटरी लागू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी लोकसभेला पंकजा मुंडेंचं केल होत ग्राउंड लेव्हलला काम केले होते. त्यांना अजित पवारांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पंकजा मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली.

सोमवारी रात्री उशिरा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवेगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांवर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला धनजय मुंडे देखील उपस्थित होते.

परळी विधानसभेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे, त्यामुळे धनजंय मुंडे यांच्या निवडणुकी करिता ही बैठक झाली आहे. बीड जिल्हातील जरंगे पाटील यांच्या वर्चस्वाला शह देऊन बीड जिल्ह्यात महायुतीच्या कशा जास्तीत जास्त जागा निवडून येतील त्यासंदर्भात चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याचे समजतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com