Maharashtra Election : मध्यरात्री दुचाकीवरून निघाले होते; झडती घेतली अन् सापडलं घबाड, नोटांची बंडलंच बंडलं, VIDEO

Maharashtra Assembly Election 2024 : आचारसंहितामध्ये राज्यभर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
Maharashtra Election
Maharashtra ElectionMaharashtra Election
Published On

Maharashtra Assembly Election 2024 : आचारसंहितामध्ये राज्यभर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून राज्यभरात नाकाबंदी केली जात आहे. वाहनाच्या तपासात ठिकठिकाणी कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले. राज्यभरात आतापर्यंत ६०० कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मुंबई, पुणे, नाशिकसह आता नागपूरमध्येही पोलिसांनी कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी बॅगेत पैसे घेऊन जाणाऱ्यावर मोठी कारवाई केली.

नागपुरातील तहसील पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांची रोकड जप्त केली. तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेंट्रल एव्हन्यू रोडवर जात असताना मोपेडवरून बॅगेत रक्कम घेऊन जाताना ताब्यात घेतले. शाकीर खान, हाजी नासिर खान असं रक्कम घेऊ जात असलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

एक व्यक्ती मोठी रोकड घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. पैशाबद्दल माहिती विचारली असताना उडवा उडवीची उत्तर मिळाली. त्यामुळे पोलिसांनी रक्कम ताब्यात घेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडे सादर केली.

ही रोकड नेमकी कोणाची यासंदर्भात उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. बांधकाम व्यवसायिकाकडे ही रक्कम घेऊन जात असल्याचा दावा करत होता. मात्र पोलीस सर्वच बाजूने याचा तपास करत आहे. नागपूरमध्ये पहिल्यांदाच एक कोटीपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली. याआधी पुणे आणि मुंबईमध्ये पोलिसांनी पाच पाच कोटी रुपये जप्त केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com