Manoj Jarange Patil on Maharashtra Election: तुमच्या हिताचा निर्णय घ्या. ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला आणा. संभ्रम आहे असे सांगितले जात आहे. संभ्रम नकोच. काय करायचे आणि काय करायचं याबाबत संभ्रम निर्माण केले जात आहेत,असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समजाला आपल्या हिताचा निर्णय घ्या. ज्याला पाडायचं त्याला पाडा, असे आवाहन केले.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
आपल्या मताशी सहमत असलेल्या उमेदवाराला मत द्या
ज्यांनी आरक्षण मिळवू दिला नाही, त्यांना सोडायचं नाही हे स्पष्ट सांगितले आहे.
मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराचे गावा गावात मराठ्यांनी व्हिडीओ घ्यावेत. त्याच्याकडून लिहून घेण्यापेक्षा व्हिडिओ घ्या.
मते वाया गेली नाही पाहिजेत.
मी पक्ष नाही सांगितला.
राज्यभरात कुणाला पाठिंबा दिला नाही.
मला पूर्ण वेळ मराठा समाजाचे आरक्षणात आंदोलनात घालवायचे आहे.
ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्याला सोडायचे नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.