Manoj Jarange : ठाकरे, मुंडे, शिंदेंनतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा; नारायण गडावरुन रणशिंग फुंकणार

Beed Dasara Melava : मनोज जरांगे पाटील यांचा नगद नारायण गडावरील दसरा मेळावा, बीड जिल्ह्यातून होणार यावर्षी दोन दसरा मेळावे..
Manoj Jarange
Manoj Jarange PatilSaam Digital
Published On

Manoj Jarange Patil Dasara Melava : दसरा मेळाव्यातून विचाराचं सोनं लूटत राजकारणाची पेरणी करणं हे काही बीड जिल्ह्यासाठी नवं नाही. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरून झालेला पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री हा संघर्ष राज्याला माहित आहे. यातच आता श्रीक्षेत्र नगद नारायण गडावर मनोज जरांगे पाटील पारंपारिक दसरा मेळाव्याची भर पडणार आहे.दसरा मेळाव्यातून समाजकारण का राजकारण? असा प्रश्न निर्माण होत आहे.

राज्यामध्ये दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या मधील फुटी नंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे, संघाचा दसरा मेळावा आणि पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा या अगोदर राज्यात चार दसरा मिळावे हे आकर्षणाच केंद्रबिंदू होते. याच दसरा मेळाव्यामधून राजकारणाची पेरणी केली जाते. यातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाचव्या दसरा मेळाव्याची भर पडणार आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil: '...तर तुमचा राजकीय एन्काऊंटर', अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मनोज जरांगे संतापले; VIDEO

बीडच्या श्रीक्षेत्र नगद नारायण गड येथे शेकडो वर्षापासून पारंपारिक दसरा मेळावा सुरू आहे मात्र याच मेळाव्यात आता मनोज जरंगे पाटिल उपस्थिती लावणार आहेत.. या मेळाव्याची तयारी सुरू आहे.आज श्री क्षेत्र नारायण गडावर महंत शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापक बैठक पार पडली या बैठकीत सर्व जाती धर्मीय दसरा मेळावा अशी हाक देण्यात आली आहे.बैठक व्यवस्था ,पार्किंग व्यवस्था, पाणी आणि अल्पोपहार या संदर्भात नियोजन करण्यात आला आहे.

नारायण गडावरुन रणशिंग फुंकणार

दसरा मेळाव्याची परंपरा तशी नगद नारायण गडावर जुनीच आहे. यावर्षी सर्व धर्मीयांना एकत्रित घेऊन हा दसरा मेळावा होणार आहे फक्त या मेळाव्यास मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती महंत शिवाजी महाराज यांनी दिली. दसरा मेळावा हा राजकीय नसून सामाजिक आहे. त्यामुळे वैचारिक सोने लुटण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी हा मेळावा आहे त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून हा मिळावा घेतला जात असल्याची माहिती विश्वस्त बी बी जाधव यांनी दिली.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil: ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटलांचे उपोषण नवव्या दिवशी स्थगित

मनोज जरांगे कोणती भूमिका घेणार?

राज्याच्या राजकारणामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आणि या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागलेलं असतं. या दसरा मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री यासह अनेक देश पातळीवरील नेते यांनी हजेरी लावली आहे. या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यानंतर आता बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा हा चर्चेचा विषय ठरणार आहे. या मेळाव्यातून आरक्षणाचा प्रश्न मांडणार ,राजकीय भूमिका घेणार की? सामाजिक विषयावर चर्चा होणार हे दसरा मेळाव्यातच पहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com