Maharashtra Assembly Elections : कल्याणमध्ये भाजपचे टेन्शन वाढले, गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी देताच शिंदे गटात बंडाचे वारे

BJP-Shivsena Conflict Over Bjp candidate Sulbha Gaikwad : भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावलं आहे.
Kalyan Politics
Kalyan East Assembly Constituencysaam tv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पहिली उमेदवार यादी जाहीर केली. पण महायुतीत त्यामुळं वादाच्या ठिणग्या उडाल्या आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघातून पक्षाने गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं या मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतून सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होत आहे.

कल्याण पूर्वेत (kalyan east assembly constituency) भाजपकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गट बंडखोरीच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. कल्याणमधील १९ नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत असून, गायकवाड यांच्या घरात उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती, असं शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड म्हणाले.

महेश गायकवाड काय म्हणाले?

गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने कल्याण पूर्वेतून उमेदवारी दिल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. आमच्या शिवसैनिकांसाठी आजचा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांनी दिली. ज्या व्यक्तीने कधीही विकास केला नाही. केवळ भ्रष्टाचार केला. स्वतःचं घर भरलं असा आरोप करतानाच, त्यांच्या घरात उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. पण तरीही उमेदवारी देण्यात आली. ही बाब अशोभनीय आहे, असंही ते म्हणाले. आम्ही सुलभा गायकवाड (Sulbha Gaikwad) यांचं काम करणार नाही, अशी भूमिका शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी मांडली.

निलेश शिंदेंची स्पष्ट भूमिका

शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश शिंदे (Nilesh Shinde) यांनीही स्पष्ट भूमिका मांडली. कल्याण पूर्वेकडील भाग पूर्ण भकास झाला आहे. शिवसेनेची ताकद असून आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. पक्षप्रमुखांना अनेकदा सांगितलं, पण ऐकलं नाही. म्हणून बंडाच्या तयारीत असल्याचं शिंदेंनी सांगितलं.

२०१९ मध्येही गायकवाडांविरोधात बंड

कल्याण पूर्व ही मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. २०१९ मध्ये गणपत गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ती जागा भाजपच्या वाट्याला गेली. २०१९ मध्ये गणपत गायकवाड यांच्याविरोधातही शिवसेना नगरसेवकांनी बंडाचा झेंडा घेतला होता. धनंजय बोराडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी गणपत गायकवाड विजयी झाले होते.

Kalyan Politics
Assembly Election 2024 : काँग्रेस-ठाकरेंकडून स्वबळाची तयारी? वडेट्टीवार यांनी एका शब्दात विषय संपवला!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com