Raj Thackeray : राज ठाकरेंची बैठक संपताच राडा, मनसे कार्यकर्त्यांची हाणामारी, पाहा व्हिडिओ

MNS Raj Thackeray news : राज ठाकरे दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मनसेच्या जिल्हा सचिवाने बंडखोरीचा इशारा दिला आहे.
mns workers meeting chandrapur dispute fighting
mns workers meeting chandrapur dispute fighting
Published On

MNS Raj Thackeray news : मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज ते चंद्रपूरमध्ये होते. त्यावेळी प्रियदर्शिनी चौकात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची त्यांनी महत्वाची बैठक घेतली. याच बैठकीमध्ये मनसे (Maharashtra Politics ) कार्यकर्तांनी राडा घातला. दोन एक भिडल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. राज ठाकरे दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांमध्ये वाद (mns workers meeting chandrapur dispute fighting ) झाला, यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मनसेच्या जिल्हा सचिवाने बंडखोरीचा इशारा दिला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या चंद्रपुरातील बैठकीत (maharashtra assembly election 2024) कार्यकर्ते भिडले, त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांमध्ये चक्क हाणामारी झाल्याने राज ठाकरे सुद्धा आवक झाले. सचिन भोयर यांना राजुरा विधान सभेची उमेदवारी जाहीर करण्यावरून हाणामारी झाल्याचे सांगितले जातेय. भोयर हे चंद्रपुरात असतात. त्यामुळे राजुरा विधानसभेत स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी करीत राजुरा विधान सभेतील कार्यकर्ते विरोधात उतरले. त्याला भोयर समर्थकांनी उत्तर दिल्याने शेवटी प्रकरण हाणामारीवर आले. आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेतात आणि शिस्त लावण्यासाठी काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

mns workers meeting chandrapur dispute fighting
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली; एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा आरोप

मनसेच्या जिल्हा सचिवाने दिला बंडखोरीचा इशारा

राज ठाकरे यांच्या बैठकीत झालेल्या राड्याने मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. खुद्द पक्ष प्रमुखासमोरच हाणामारी झाल्याने हा वाद किती टोकाला गेलाय, याचाही प्रत्यय आला. राजुरा मतदारसंघातील उमेदवारीवरून हा राडा झाल्याचे समोर आले. राजुरा विधानसभा उमेदवार हा स्थानिक असावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र पक्षाने चंद्रपूर शहरप्रमुख सचिन भोयर यांना ही उमेदवारी देऊ केली. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. आता ही नाराजी मनसेला स्थानिक पातळीवर महागात पडण्याची शक्यता आहे. जिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांनी आता ही उमेदवारी मागे न घेतल्यास बंडखोरी करण्याचा इशारा दिलाय, तर पक्षात असे प्रकार चालत असतात, अशी भूमिका सचिन भोयर यांनी व्यक्त केली.

विदर्भातील मनसेमध्ये संघटनात्मक फेरबदल?

विदर्भातील मनसेमध्ये लवकरच संघटनात्मक मोठे फेरबदल होतील, असे राज ठाकरेंनी पत्रकारांशी खासगीत सांगितलेय. अनेक निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करुन, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे.

राजकीय परिस्थिती आणि पक्षांची एवढी सरमिसळ झाली आहे की मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मात्र इतर पक्षातील बंडखोर आमच्याकडे आल्यास थेट उमेदवारी देणार नाही. आधी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ नंतर आलेल्यांचा विचार करू, असे राज ठाकर म्हणाले. विदर्भातील बहुतांश जागा लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com