Virar News: गुजरातमधून येणाऱ्या १०० ट्रॅव्हल्स विरारमध्ये अडवल्या, मतदानासाठी घेऊन असल्याचा बविआचा आरोप

Virar News: विरार येथे गुजरातवरुन येणाऱ्या १०० ट्रॅव्हल्सला अडवण्यात आले आहे. मतदारांना आमिष दाखवून घेऊन जात असल्याचा आरोप बविआने केला आहे.
Virar News
Virar NewsSaam Tv
Published On

आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे.मतदानाच्या दिवशीच गुजरात पासिंगच्या १०० च्या ट्रॅव्हल्सला विार शिरसाड फाट्यावर अडवण्याच आले आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी या ट्रॅव्हल्स अडवल्या आहेत. मतदारांना आमिष दाखवून त्यांना घेऊन जात असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे.

Virar News
Maharashtra Election 2024 Exit Poll LIVE: एक्झिट पोलमध्ये महायुतीची हवा, तर महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवलं

वसई विरारसह मुंबई परिसरातील मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. विरार शिरसाड फाटा येथे मध्ययरात्री पोलिस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. पोलिस सध्या ट्रॅव्हल्सची तपासणी करत आहे. या ट्रॅव्हल्सची तपासणी केली असून आता ट्रॅव्हल्स सोडून देण्यात आल्या आहेत.

या ट्रॅव्हल्सला पासिंग जरी असले तर त्यांना माणसे नेण्याचा पासिंग नाही, असा आरोप बहुजनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरारचे राजकारण चिघळले असल्याचे दिसत आहे. मतदानाच्या दिवशीच मतदारांना आमिष दाखवून घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले आहेत.

Virar News
Assembly Election: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान; EVM मध्ये कैद होणार ४,१३६ उमेदवारांचं भवितव्य

काल राज्याच्या राजकारणात मोठी धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.विनोद तावडे हे पैसे वाटण्यासाठी आले होते, असा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला होता. दरम्यान, या हॉटेलमधून १० लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याचसोबत विनोद तावडे यांच्याकडे व्यव्हाराच्या नोंदी सापडल्याचा दावा आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला होता. याच आरोपांमुळे विनोद तावडे यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला आहे.

Virar News
Maharashtra Election 2024 Exit Poll LIVE: एक्झिट पोलमध्ये महायुतीची हवा, तर महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com