Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: छगन भुजबळांनी बजावला मतदानाचा अधिकार

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live Updates: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. २८८ मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान करता येईल. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. राज्यभरामध्ये मतदानाच्या दिवशी नेमक्या काय घडामोडी घडत आहेत यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्सचा आढावा आपण एका क्लिकवर घेणार आहोत...
Maharashtra Assembly Election 2024 Voting: विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Assembly Election 2024 VotingSaam Tv

Maharashtra Assembly Election: छगन भुजबळांनी बजावला मतदानाचा अधिकार

छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

सगळ्यांनी शांततेत मतदान करावं,सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन

सुधांशू त्रिवेदी यांनी केलेले आरोप खोटे खोटे खोटे

मी त्यांच्या विरोधात मानहनीची तक्रार दाखल केली आहे

त्यांनी ५ प्रश्न विचारले आहेत मी त्याची सगळी उत्तरं ते जिथं म्हणतील तिथे देणार

सायबर तक्रार मी कालच दाखल केली आहे

ते अजित दादा आहेत, अजित पवार यांनी आज चौकशीची मागणी केली आहे, मी ती काल केली आहे

अजित पवार काय माझंही मत आहे की चौकशी झाली पाहिजे आणि सखोल झाली पाहिजे

सगळ्यांनी शांततेत मतदान करावं हे आवाहन बारामती करांना करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Raigad News: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

० कोलाडजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

० मुंबई कडून कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी

० कोकणात मतदानासाठी निघालेल्या चाकरमान्यांची प्रवासात कोंडी

० मुंबई ते माणगाव प्रवासासाठी लागताहेत 9 तास

Solapur Assembly Election: सोलापूरचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांनी बजावला मतदानाचा अधिकार

पत्नीस्मिता देशमुख आणि मुलगा रोहन देशमुख सह सुभाष देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

सोलापुरातील लिटिल फ्लावर स्कूल या मतदान केंद्रावर येऊन सुभाष देशमुख यांनी केले मतदान

यावेळी सुभाष देशमुख यांनी नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन

विरोधकांकडे टीका करण्यासाठी कोणतेही मुद्दे नव्हते त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर टीका त्यांनी केली

मी मात्र दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली

अशी प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली

दरम्यान देशमुख यांनी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार असल्याचं व्यक्त केला विश्वास

सिल्लोडमधील रामनगर येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला, सकाळपासून एकही मतदान नाही

एकही मतदाराने मतदान केले नाही,सिल्लोड येथील रामनगर येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.रामनगर हे पुनर्वाचित गावठाण असून गावठाण 26 वर्ष झाले या गावाला स्मशानभूमी नाही दफनभूमी नाही रेकॉर्डला सगळे सुख सुविधा उपलब्ध आहे नागरिकांची मागणी आहे नगररचनेप्रमाणे प्लॉट स्मशानभूमी दफनभूमी गावाच्या ताब्यात देण्यात यावी.

Wardha Assembly Election:वर्ध्यातील भाजप उमेदवार पंकज भोयर यांनी सहपरिवार मतदान केंद्रावर येत बजावला मतदानाचा हक्क

- वर्धेचे भाजपा उमेदवार पंकज भोयर यांनी सहपरिवार मतदान केंद्रावर येत बजावला मतदानाचा हक्क

- आमदार पंकज भोयर आपल्या आई, वडील, पत्नीसह मतदान केंद्रावर

- पंकज भोयर यांनी वर्धेच्या मतदान केंद्र क्रमांक 202 वर बजावला हक्क

- आज आमच्या परिवारासाठी आनंदाचा दिवस आहे, परिवाराच्या तीन पिढ्या एकत्रित येऊन मतदान केल, नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात मतदान करावा

Maharashtra Assembly Election: आजची निवडणूक महाराष्ट्रातील शेतकरी, युवक, महिलांसाठी व महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची आहे- शरद पवार

आपला महाराष्ट्र धर्म हा संपूर्ण भारताला एक दिशा देतो आणि त्याच धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.

म्हणूनच आपण सर्वांनी या अत्यंत निर्णायक व महत्वाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा आणि महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याचे काम करावे.

कोथरूड मधून माझ्यापेक्षा जास्त मताधिक्य चंद्रकांत पाटील यांना मिळेल-मुरलीधर मोहोळ

कोथरूड मधून माझ्यापेक्षा जास्त मताधिक्य चंद्रकांत पाटील यांना मिळेल

चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ७४ हजारांचा लीड याच्यापुढे आम्ही जाऊ

विनोद तावडे कशाला येऊन पैसे वाटतील? ते आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर आमचे सर्व नेते बोलले आहेत

महायुतीचा मुख्यमंत्री होईल आणि कोणाला मुख्यमंत्री करायचे हे युती ठरवेल

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील

Maharashtra Assembly Election : मतदान करण्यापूर्वी धनंजय मुंडे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक..

राज्याचे मंत्री तथा परळी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे हे मतदानापूर्वी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत..यावेळी त्यांनी वैद्यानाथाचा दुग्धभिषेक करत,आरती करत, मनोभावे दर्शन घेतल आहे..

Baramati Assembly Election: शरद पवार मतदानासाठी रवाना

शरद पवार मतदानासाठी रवाना झाले आहेत. ते गोविंद बागेतून माळेगावकडे निघाले आहे.

Wardha Assembly Election: वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांनी बजावला मतदानाचा हक्क

- वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांनी बजावला मतदानाचा हक्क

- वर्ध्यातील देवळी येथील यशवंत शाळेमध्ये सपत्नीक केले मतदान

- लोकशाहीच्या उत्सवात सामील होऊन सर्वांना मतदान करण्याचे खासदार रामदास तडस यांनी केले आवाहन..

Maharashtra Assembly Election LIVE : तुमसर विधानसभेत मतदान यंत्रात बिघाड

तुमसर विधानसभेच्या तुमसर शहरांमधील मतदान केंद्र क्रमांक 186 मधील बांगडकर विद्यालयात असलेल्या मतदान ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला. हीच परिस्थिती पुढसर तालुक्यातील मांडळ येथेही निर्माण झाली. त्यामुळे तब्बल एक तास मतदान प्रक्रिया रखडली. सकाळी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांना ईव्हीएम मशीनचा फटका बसल्याने त्यांना रांगेत तात्काळ उभं राहावं लागलं. तासभरानंतर केंद्र दुरुस्ती केल्याने मतदान प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.

Raigad Assembly election: महाडमध्ये मतदान मशिन बंद पडले

० महाड शहरातील चवदार तळे येथील घटना ० मतदानाच्या सुरुवातीलाच 20 मिनिट मतदारांचा खोळंबा ० मतदान मशिनमधील तांत्रिक बिघाड दुर झाल्यानंतर मतदार सुरुमहाडमध्ये मतदान मशिन बंद पडले

Latur Assembly Election: लातूरमध्ये धीरज देशमुखांनी बजावला मतदानाचा अधिकार

लातूरमध्ये धीरज देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Maharashtra Assembly Election LIVE 2024: गायक राहुल देशपांडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

राहुल देशपांडे यांनी आज पुण्यात केलं मतदान

राहुल देशपांडे यांच्या सोबत त्यांची पत्नी नेहा देशपांडे यांनी सुद्धा केलं मतदान

बोटाची शाई दाखवत सेल्फी सुद्धा घेतला

Maharashtra Assembly Election LIVE: सिद्धिविनायक मंदिरात अमित ठाकरे आणि सदा सरवणकरांनी एकाच वेळी घेतले बाप्पाचे दर्शन

माहिम मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांनी एकाच वेळी बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

Akola Assembly Election: अकोल्यात ईव्हीएम मशीन बंद पडली

अकोल्यातल्या अकोला पूर्व मतदार संघातील पोद्दार इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथील मतदान केंद्रावरील बूथ क्रमांक 221 वर बंद पडलेली ईव्हीएम मशीन झाली दुरुस्त. तब्बल 44 मिनिटांनी झाली पुन्हा मतदानाला सुरुवात. मात्र तोपर्यंत अनेक मतदार या ताटकळत होते उभे. तर अनेक मतदार मतदान न करताच परतले..

Maharashtra Assembly Election LIVE: मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या आंतरवाली सराटीत मतदान प्रक्रियेला सुरुवात

जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेला सुरुवात झालीय. मराठा आरक्षणाच केंद्र असलेल्या अंतरवाली सराठीत देखील मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालीय .

अंतरवाली सराटीतील ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहे.अंतरवली सराटी हे गाव घनसांवगी विधानसभा मतदारसंघांमध्ये येत. आणि या मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे राजेश टोपे शिवसेनेचे हिकमत उढाण आणि भाजपचे बंडखोर सतीश घाडगे या तिघांमध्ये लढत होत असून अंतरवली सराटी सह घनसांवगी विधानसभा मतदारसंघातील नागरिक कोणाच्या पारड्यात मताच दान टाकतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

दिलीप वळसे पाटील मतदानासाठी रवाना

सलग सात वेळा आमदार झालेले दिलीप वळसे पाटील आठव्यांदा आंबेगावच्या निवडणुकीला सामोरे जातायेत. पत्नी आणि लेकिन औक्षण केल्यावर ते मतदानासाठी निघालेत. मात्र यावेळी थेट शरद पवारांनी गद्दारीचा शिक्का मारत थेट आमच्यात कौटुंबिक संबंध नव्हेत, असं सूचित केलं. पण शरद पवारांनी सभा घेतल्यानंतर ही विजय माझाचं होईल असा विश्वास वळसेंनी व्यक्त केलाय.

Kalyan Assembly Election: कल्याण पूर्व मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी बजावला मतदानाचा हक्क

कल्याण पूर्व मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Maharashtra Assembly Election LIVE: खासदार धानोरकर यांनी केले मतदान

द्रपूरच्या खासदार प्रतिभा धनोरकर यांनी वरोरा येथे मुलगा आणि उमेदवार भाऊ प्रवीण काकडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उमेदवार प्रवीण काकडे हेही सपत्नीक मतदानासाठी आले. पक्षाकडे हट्ट करून सख्ख्या भावासाठी त्यांनी उमेदवारी मागून घेतली. यामुळे वरोरा मतदारसंघात धनोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काल व्हायरल झालेल्या व्हीडिओवर प्रतिक्रिया दिली. माझे वक्तव्य समाजासाठी नव्हते, तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी होते. समाजाच्या लोकांनी समाजकारण करावे, राजकारण नाही, असेही त्या म्हणाल्या.

Maharashtra Assembly Election LIVE: अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी बजावला मतदानाचा हक्क...

अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तळेगाव दाभाडे येथील नथूभाऊ भेगडे महाविद्यालयात राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रात मतदारांची गर्दी असल्याने मतदारांना भेटत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण कुटुंबासह बापू भेगडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक वेगळी असली तरी मीच निवडून येणार असे त्यांनी मत व्यक्त केलंय. हा महाराष्ट्राच्या लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे तो बजावलाच पाहिजे असं मत अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी व्यक्त केलय..

Maharashtra Assembly Election: अभिनेता अली फझलने बजावला मतदानाचा अधिकार

बॉलिवूड अभिनेता अली फझलने मतदान केले आहे.

नंदुरबारचे उमेदवार विजयकुमार गावित यांनी बजावला मतदानाचा अधिकार

आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ विजयकुमार गावित यांनी नटावद या गावी जिल्हा परिषद शाळेत मतदान ....

मतदान करण्यापूर्वी कुलदैवत देव मोगरा मातेच दर्शन घेतल्यानंतर मतदान....

लोक महायुती सरकारवर सोबत असल्याने लोक निवडून देतील असा विश्वास देखील व्यक्त केला.

Maharashtra Assembly Election: लोकसभा पोटनिवडणूकीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी केले मतदान

नायगाव येथे मुळगावी रवींद्र चव्हाण बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव आहेत रवींद्र चव्हाण.

काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होऊ घातली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस कडून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आले आहे रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी नायगाव येथे मतदानाचा हक्क बजावला.

Maharashtra Assembly Election: भरत गोगावले यांनी बजावला मतदानाचा हक्क

भरत गोगावले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.मनदान करून बाहेर आल्यानंतर महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. मतदार संघात चांगल वातावरण आहे. चौकार ठालेला आहे. निकाल 23 तारखेला कळेल पण आम्ही आज रात्रीच निकल देऊ अस देखील गोगावले म्हाणाले.

Varsha Gaikwad: वर्षा गायकवाड यांनी कुटुंबियांसह केलं धारावीत ‌मतदान

संविधानानं अधिकार दिला आहे तो‌ बजावला पाहिजे

महाराष्ट्रासाठी आज मतदान केलं पाहिजे

कालचा दिवस तुम्हाला माहिती आहे कशानं गाजला

नाशिक, मुंबई, विरार प्रत्येक ठिकाणी पैशांचं वाटप होतंय

आमचा पुर्निविकासाला विरोध नाही

पण ज्या पद्धतीनं धारावीतल्या लोकांना बाहेर फेकून ‌देशोधडीला लावलं जात आहे

त्याला विरोध आहे

काल आता पैसे वाटप केल्यानंतर भाजपा आता खोटे आरोप करत आहे

त्यात काही तथ्य आहे असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

Sachin Tendulkar Voting: सचिन तेंडुलकर पत्नी अन् मुलीसह मतदानासाठी दाखल

सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह वांद्रातील मुंबई पब्लिक स्कूल वर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल

Vidhan Sabha Voting live Updates: बाळासाहेब थोरातांनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा अधिकार

बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबियांसोबत मतदानाचा अधिकार बजावला आहे. मुलगी जयश्री थोरात आणि पत्नीसोबत मतदान केले आहे.

Paithan Assembly Election: पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रतील मशीन बंद पडले

पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील 226 केंद्रतील मशीन बंद पडले

प्रशासनाकडून मशीन बदलण्याचे काम सुरू

नागरिकांना मतदानासाठी काही वेळ थांबावे लागणार

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमधे मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमधे मतदान करतानाचे व्हिडिओ होत आहे व्हायरल

मतदान केंद्रात मोबाईल वरून कार्यकर्ते करत आहे चित्रीकरण..

मतदान केंद्रांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह...

Maharashtra Vidhan Sabha election 2024 Live: नवाब मलिक मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल

नवाब मलिक मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.ते थोड्याच वेळात मतदान करणार आहेत.

Sambhaji Nagar Assembly Election Live: संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

Vidhan Sabha election 2024 Live: राज्यात महायुतीचे सरकार येणार- चंद्रकांत पाटील

राज्यात महायुती चे सरकार होणार. आम्ही नक्की जिंकू आम्हाला विश्वास आहे, अशा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.विनोद तावडे यांच्यावर झालेला आरोप खोटा आहे. त्यांच्या विरोधात सापळा रचला गेला. एखाद्याच्या माणसाला आयुष्यातून उठवताय का?, असं त्यांनी म्हटलं आहे.

Vidhan Sabha election 2024 Live मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी बजावला मतदानाचा अधिकार

सर्वानी घराबाहेर येऊन मतदान करा

यावेळी मतदान संख्या वाढेल नागरिकासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत

कुलाबा मध्ये मतदान कमी झाले होते यावेळी मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे

बारामतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

युगेंद्र पवार यांनी कुटुंबियांसोबत जाऊन मतदान केले आहे. त्यांचे वडिल, बहिण आणि आई यांच्यासोबत त्यांनी मतदान केले आहे,

Vidhan Sabha election 2024: सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क

सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आह. बारामतीमध्ये त्यांनी मतदान केले आहे.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेत केलं मतदान

किरण सामंत आणि पत्नी वर्षा सामंत एकत्र मतदान केंद्रावर

दोन्ही बंधूंचा विजय निश्चित - किरण सामंत

Vidhan Sabha election 2024 Live: चंद्रकांत पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

चंद्रकांत पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोथरूड येथील महात्मा सोसायटी येथील मतदान केंद्रावर बजावला हक्क

Vidhan Sabha election 2024: रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात

रत्नागिरी जिल्ह्यात 1747 मतदान केंद्र

रत्नागिरी जिल्ह्यात पाच मतदार संघात 38 उमेदवार रिंगणात

13 लाख 39 हजार 697 मतदार

रत्नागिरी जिल्ह्यात १९९५ नंतर पहिल्यांदा अपक्ष मोठ्या प्रमाणावर रिंगणात

रत्नागिरी जिल्ह्यात चार ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत तर एका ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत

रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत आणि किरण सामंत या दोन बंधूंची प्रतिष्ठा पणाला

तर रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम निवडणूक रिंगणात

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायर ब्रँड भास्कर जाधव यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला

Vidhan Sabha election 2024 Voting live  :अमित ठाकरे मतदानासाठी रवाना मनसेचे

माहिमचे उमेदवार अमित ठाकरे हे मतदानासाठी रवाना झाले आहेत.

पुण्यातील कोथरूड मतदार संघातील EVM मशीन बंद

अण्णासाहेब पाटील शाळेतील ईव्हीएम पाऊण तासापासून बंद

टेक्निकल कारणामुळे ईव्हीएम बंद झाल्याची अधिकाऱ्यांची माहिती

युगेंद्र पवार मतदान करण्यासाठी केंद्रावर दाखल

अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं त्याच मतदान केंद्रात युगेंद्र पवार मतदान करणार

प्रथमच एकमेकांसमोर उभा असलेले दोन प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मतदान केंद्रावर व एकाच बॅलेट पेपरवर मतदान

सुप्रिया सुळे मतदानासाठी रवाना

सुप्रिया सुळे या मतदानासाठी मतदान केंद्राकडे रवाना झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या मतदान करणार आहेत.

युगेंद्र पवार कुटुंबासह मतदानासाठी काटेवाडीकडे रवाना

युगेंद्र पवार कुटुंबासह मतदानासाठी काटेवाडीकडे रवाना

सोबत वडील श्रीनिवास पवार, आई शर्मिला पवार देखील आहेत

श्रीनिवास पवार स्वतः गाडी चालवत निघाले

Maharashtra assembly election 2024 Voting live: शिवडी मतदार संघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांनी बजावला मतदानाचा हक्क

शिवडी मतदार संघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

नाशिकच्या नामांकित हॉटेल मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या व्यक्तीकडे सापडले कोट्यवधी रुपये

नाशिकच्या नामांकित हॉटेल मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या व्यक्तीकडे सापडले कोट्यवधी रुपये

मंत्रालयातील कार्यरत सिंचन विभागातल्या महिला अधिकारी अहिरराव तिथं उपस्थित होत्या

शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांच्या भगिनी अलका अहिरराव तिथं उपस्थित होत्या

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

Maharashtra assembly election 2024 Voting live: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बी.आर‌ हायस्कूलमधल्या बूथ क्रमांक 169 मधील मतदान यंत्र बंद

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बी.आर‌ हायस्कूलमधल्या बूथ क्रमांक 169 मधील मतदान यंत्र बंद. सकाळी मतदान सुरू झाल्यापासूनच मतदान यंत्रात बिघाड. या मतदान केंद्रावरील मतदान अद्याप सुरू झालं नाही. मतदान केंद्रावर मतदार ताटकळलेत. दरम्यान, अकोल्यात विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजता पासून सुरुवात झालीए. मात्र अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बी.आर‌ हायस्कूलमधल्या बूथ क्रमांक 169 मधील मतदान यंत्र बंद आहेय. त्यामुळ मतदान केंद्रावर मतदान ताटकळलेत उभे आहेय.

Maharashtra Vidhan Sabha election 2024 Voting live: आर एम भट शाळेतील मतदान केंद्र EVM मशिन बंद

शिवडी-लालबाग विधान सभा मतदारसंघातील आर एम भट शाळेतील मतदान केंद्र EVM क्रमांक ४१ नंबरची मशिन बंद झालीय तर प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा अपूरा असल्यामुळे EVM मशीन सुरू नाही झाल्या आहेत.

Maharashtra Vidhan Sabha election 2024 Voting live: छत्रपती संभाजी नगरमध्ये EVM मध्ये बिघाड

छत्रपती संभाजी नगरमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदारांचा खोळंबा होताना दिसत आहे.

Assembly election 2024 Voting live : गोविंद बाग निवासस्थानावरून शरद पवार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थोड्याच वेळात निघणार

राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडतेय... बारामती मतदारसंघात एकूण 386 मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडतीय..बारामती मधील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी शरद पवार, प्रतिभा पवार, सदानंद सुळे, रेवती सुळे आणि विजय सुळे हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत... सध्या गोविंद बाग या निवासस्थानावरून शरद पवार थोड्याच वेळात ते मतदान केंद्राकडे जाणार आहेत

कसबा मतदार संघाचे महाविकास आघाडी उमेदवार आमदार रवींद्र धंगेकरानी बजावला मतदानाचा अधिकार

कसबा मतदार संघाचे महाविकास आघाडी उमेदवार आमदार रवींद्र धंगेकरानी रविवार पेठेतील ९ नंबर शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेता सुबोध भावे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर

कसबा मतदारसंघात करणार मतदान

कसबा पेठेतील गुजराती प्रायमरी शाळेत करणार मतदान

Maharashtra Vidhan Sabha election 2024 :पारनेरच्या उमेदवार राणी लंके यांचे कुटुंबियांकडून औक्षण

पारनेरच्या उमेदवार राणी लंके यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात येत आहे. त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Maharashtra Assembly Election: शेकापचे नेते जयंत पाटील यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला

आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे.

Vidhan Sabha Voting live : बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे आईकडून औक्षण

बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी चांगली लढत पाहायला मिळणार आहे. युगेंद्र पवार यांचे राहत्या घरी आईकडून औक्षण करण्यात येत आहे.

Rajkumar Rao: अभिनेता राजकुमार राव मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल

बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील मतदानासाठी हजेरी लावली आहे. अभिनेता राजकुमार राव हा मतदानासाठी मतदानकेंद्राबाहेर दाखल झाला आहे.

Vidhan Sabha Voting live : मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

Assembly election 2024 Voting live :शिवसेना नेते अब्दुल सत्तारांनी कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला

शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या पत्नी नफिसा बेगम तसेच कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला .मतदान हे लोकशाहीचे पवित्र कर्तव्य आहे. आपला हक्क बजावून कर्तव्य पार पाडा. निर्भीडपणे मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी सांगा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी

पुण्यात ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी मतदान केंद्रावर येत आहेत

- सकाळी सुरुवातीलाच मतदान करण्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा कल

- ⁠पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचा मतदानाला प्रतिसाद

Maharashtra assembly election 2024 Voting live: शंकर जगताप यांनी बजावला मतदानाचा अधिकार

महायुतीचे चिंचवडचे उमेदवार शंकर जगताप यांनी मतदान केले आहे. त्यांनी चिंचवड येथे मतदान केले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar: सर्वांनी मतदानाचा हक्का बजावला पाहिजे, संदिपान भुमरे यांचं मतदारांना आवाहन

आज मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा अशी मी सर्व मतदानांना विनंती करतो आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपला मतदानाचा हक्क बाजावला पाहिजे ही विनंती.

असा प्रकार व्हायला नको पण ज्यावेळेस समोरच्या उमेदवाराच्या लक्षात येतं की आत्ता आपली परिस्थिती डाऊन झालेली आहे त्यावेळेस असे बॅड हल्ले केले जातात.

अंबादास दानवे यांनी विलास बापू यांच्या विषयी जे वक्तव्य केला आहे मला वाटतं हे वक्तव्य कोणी असू द्या उद्या कोणावरही प्रसंग असतो पण मला वाटतं बापू दावखान्यात आहे आणि बापू दवाखान्यात असताना बापू बद्दल भाषणात जे काही वक्तव्य केलं बापूला दरोडेखोरांनी मारलं बापू वेगवेगळे चर्चा केली मला वाटतं हे अंबादास दानवेला शोभत नाही,

म्हणून मला सांगत हे जे काही वक्तव्य केलं आहे विरोधी पक्ष नेत्यांनी थोडं जबाबदारीने बोललं पाहिजे बापू त्या दिवशी चार वाजेपर्यंत प्रचारात होते आणि वक्तव्य केलं बापूंना दरोखोरानी मारलं गुंड्याने मारलं तर बापूला कोणीही मारलं नाही,

अंबादास दानवे ला हे शोभत नाही, विरोधी पक्ष नेत्यांनी थोडं जबाबदारीने बोललं पाहिजे.

Ratnagiri News: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार उदय सामंत यांनी केल्या मतदान

सामंत यांच्या पाली गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 इथे बजावला मतदानाचा हक्क

मतदारांसोबत रांगेत उभे राहत सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

त्यांच्या मूळ गावी जाऊन हातनोशी येथे जाऊन बजावला मतदानाचा हक्क

गेल्या ३ टर्म पासून संग्राम थोपटे भोर चे आमदार

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वारजे येथील मतदानाला सुरुवात

पुण्यातील खडकवासला मतदारसंघात भाजप चे भीमराव तापकीर चौथ्यांदा विजयी होणार का?

तापकीर यांच्या समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी चे सचिन दोडके आणि मनसे चे मयुरेश वांजळे यांचे आव्हान

गेल्या ३ टर्म पासून खडकवासला मतदारसंघात भाजप चे वर्चस्व

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील दांपत्याने मतदानासाठी केली ट्रीप कॅन्सल

⁠तीन महिन्यांपूर्वी बुक केलेली शिमला मनालीची ट्रीप कॅन्सल करून दांपत्य मतदानासाठी दाखल

⁠आर्थिक नुकसान सहन करून बजावला मतदानाचा हक्क

इतर मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन

वडगाव शेरी चे उमेदवार बापू पठारे यांनी बजावला मतदानाचा हक्क

बापू पठारे वडगाव शेरी मधून महा विकास आघाडी चे उमेदवार

बापू पठारे यांच्या समोर विद्यमान सुनील टिंगरे यांचे आव्हान

कल्याणीनगर येथील घडलेल्या अपघातामुळे वडगाव शेरी मतदारसंघाची राज्यात चर्चा

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकरांनी बजावला मतदानाचा अधिकार

आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे.मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकरांनी बजावला मतदानाचा अधिकार

अमित देशमुखांची बजावला मतदानाचा अधिकार

लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

रायगड जिल्ह्यात मतदानाला सुरुवात, 24 लाख 88 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 2 हजार 760 मतदान केंद्र उभारण्यात आली असून 24 लाख 88 हजार 788 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी 15 हजार 169 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा सु व्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलाय. शिवाय अतिरिक्त कुमक तैनात ठेवण्यात आली आहे. जिल्हा भरात 4 हजार 300 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सज्ज आहेत. 1 हजार 684 मतदान केंद्रांवरील मतदानाचे वेबकास्टिंग केलं जाणार आहे.

मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये  बजावला मतदाना हक्क

मोहन भागवत यांनी नागपूर येथे मतदानाचा अधिकार बजावला आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

छत्रपती संभाजीनगर येथे ११ लाख रुपयांची रोकड जप्त

छत्रपती संभाजीनगर येथे हर्सुल टी पॉइंटच्या पथकाने 11 लाख रूपये जप्त केले आहेत. एका गाडीत ११ लाखांची रक्कम जप्त केली आहे. याबाबत चौकशी सुरु आहे.

मनमाड - येवला रोडवर बस आणि ट्रक धडकून भीषण अपघात

मनमाड - येवला रोडवर अंकाई फाट्यावरील बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. सकाळी 6 वाजता अपघात झाला असून ट्रकचालक आणि बसचालकाची प्रकृती गंभीर आहे.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शिवसेनेच्या शायना एनसी यांनी घेतलं मुंबादेवीचे दर्शन

शायना एनसी या शिवसेनेच्या मुंबादेवीच्या उमेदवार मतदानापूर्वी शायना एनसींकडून मुंबादेवी चरणी प्रार्थना केली आहे.

अमित ठाकरे मतदानापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे आशिर्वाद घेणार

आपल्या विधानसभेचे उमेदवार श्री. अमितजी ठाकरे मतदानाचा दिवशी बुधवार, दि. २०-११-२०२४ रोजीचा श्री गणेश गजाननाचा आशीर्वादने करणार आहेत, सकाळी ८:०० वाजता श्री गणेश उद्यान, ८:१५ वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर, ८:३० वाजता प्रबोधनकार ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून मतदान करायला बालमोहन शाळेत जाणार आहेत.

सर्वांनी मतदान करा, अजित दादांकडून आवाहन 

अजित पवार यांनी बारामती येथे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. याचसोबत त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आईने आधीच मतदान केलं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

सुनेत्रा पवार मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल

बारामतीमध्ये अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात ते मतदान करणार आहेत.

ऐरोली विधानसभेतील घणसोली सिम्प्लेक्स परिसरात मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप

स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाचा डाव उधळून लावला .हातातील पैसे टाकून पैसे वाटप करणाऱ्यांनी पळ काढला. निवडणूक अधिकारी पोलीस घटनास्थळी दाखल, पोलिसांनी काही रक्कम जप्त केली. अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांच्याद्वारे पैसे वाटप करण्यात येतं असल्याचा स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांचा आरोप आहे. मध्यरात्री विजय चौगुले आणि अंकुश कदम कार्यकर्त्यांसह आमने सामने आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण चिघळण्यापासून थांबले.

Vasai News: गुजरात पासिंगच्या १०० च्या वर ट्रॅव्हल्स बाविआच्या कार्यकर्त्यांनी आडवल्या

गुजरात पासिंगच्या १०० च्या वर ट्रॅव्हल्स विरार शिरसाड फाट्यावर बाविआच्या कार्यकर्त्यांनी आडवल्या आहेत

वसई विरार सह मुंबई परिसरातील मतदाराना वेगवेगळे अमिष दाखवून त्यांना मतदानासाठी घेवून जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे

विरार शिरसाड फाटा येथे मध्यरात्री पोलीस ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले असून ट्रॅव्हल्स ची तपासणी करुन सोडण्यात आल्या आहेत.

या गाड्यांना पासिंग जरी असले तर त्यांना माणसे नेण्याचा पासिंग नाही असा आरोप बहुजनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Pune News: पुण्यामध्ये मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात

पुणे पोलिस दलातील ६०० पोलीस अधिकारी, सहा हजार ८०० पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे एक हजार ७५० जवान बंदोबस्तास तैनात

पोलिस कर्मचाऱ्यांसह संवेदनशील मतदान केंद्रात एसआरपीएफ आणि सीआरपीएफ तैनात

संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर

आतापर्यंत एक हजार ७०० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

Pune News: मॉर्निंग वॉकसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर दाखल

मॉर्निंग वॉकसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर दाखल

पुण्यातील कोथरूड मधील महेश विद्यालयाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिक मतदान करण्यासाठी दाखल

सकाळी ६ वाजताच फिरायला आलेले ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर हजर

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात जवळपास पावणे ४ लाख मतदार

सकाळी ७ वाजता मतदान केंद्र करण्यात येणार खुलं

Pune News: पुणे जिल्ह्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्राची उभारणी

राज्यात भौगोलिकदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकाचे असलेल्या पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार

पुणे जिल्ह्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्राची उभारणी

जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड मतदारसंघात असून, ही संख्या ६ लाख ६३ हजार ६२२

अधिक वयोमान असलेल्या मतदारांना मतदान केंद्रांवर मतदान करण्याची इच्छा असेल, अशांसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था, गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रांची निर्मिती, महिला व ज्येष्ठांसाठी जनजागृती

Pune News: आमदार रविंद्र धगेकर आणि पत्नी मतदान करण्यासाठी निघाले

कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धगेकर मतदानाचा हक्का बजावण्यासाठी निघाले

आमदार रविंद्र धगेकर आणि पत्नी मतदानासाठी निघाले

सकाळी ७ वाजता करणार रविवार पेठेतील मतदान केंद्रांवर मतदान करणार

Mumbai News: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला थोड्याच वेळात होणार सुरूवात

विधानसभा निवडणूक प्रकिया काही वेळात सुरु होणार आहे.

यासाठी मतदान केद्रवर जय्यत तयारी करण्यात आली आहे

भायखळा तारबाग याठिकाणी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर मतदान करणार आहेत

Pune News: मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

मतदान केंद्रांत मोबाईल बाळगण्यास मनाई

मतदान केंद्रात छायाचित्रणास बंदी

ज्वलनशील वस्तू आणि शस्त्र बाळगण्यास मनाई

प्रशासनाचे आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com