Maharashtra Assembly Election:  मुंबईतील या प्रतिष्ठीत जागांसाठी अशी आहे मविआची रणनिती, अनिल परब यांनी सांगितला 'मास्टर प्लॅन'

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मुंबईत ३६ पैकी २२ जागा शिवसेना (उबाठा) गट लढवत आहे.
Anil Parab
Anil ParabSaam tv
Published On

मुंबई : (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना (उबाठा) मुंबईतील 36 विधानसभेच्या जागांपैकी 22 जागा लढवत आहे. लोकसभा निवडणुकीत सेनेने (उबाठा) मुंबईच्या 4 पैकी 3 जागा जिंकल्या. पक्षाचे रणनीतीकार अनिल परब यांनी दावा केला आहे की, शिवसेना (उबाठा) मुंबईत किमान 15 जागा जिंकेल. ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी हे कठीण होईल कारण मनसे महायुतीच्या संभाव्यतेला हानी पोहोचवेल. वरळी, माहीम आणि वांद्रे पूर्व या प्रतिष्ठेच्या जागांवर तिरंगी लढत होईल आणि यात शिवसेनेला (उबाठा) नक्कीच यश प्राप्त होईल असेही परब म्हणाले.

Anil Parab
Assembly Election: चमकणारा लोकप्रतिनिधी नको तर.., पुण्यातील मतदारांचा जाहीरनामा सोशल मीडियावर व्हायरल

जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाही- परब

 मुंबईत जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेत असल्याची चर्चा राजकिय वर्तूळात होती, मात्र अनिल परब यांनी याचे खंडण केले आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कोणतेही मतभेद नसल्याचे ते म्हणाले. 2019 मध्ये 30 वरून काँग्रेस फक्त 10 जागा लढत आहे. आम्ही 22 जागा लढत आहोत हे खरे आहे, पण मुंबई हा नेहमीच शिवसेनेचा (उबाठा) गड राहिला आहे असंही ते म्हणाले. 2109 मध्येही मुंबईत 15 आमदार निवडूण आले. यावेळी देखील, आम्ही किमान 15 जिंकू असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे.

अल्पसंख्यक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

 शिवसेनेने (उबाठा)  वर्सोव्यात मुस्लिम उमेदवार हारून खानला मदत केली आहे. यामागे कुठलीही रणनीती नसल्याचे परब म्हणाले. अल्पसंख्याक समाजाने आपल्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे, त्यांना उद्धव ठाकरेचे मुख्यमंत्री म्हणून काम आणि त्यांचे राजकारण आवडले. त्यांनी आम्हाला लोकसभेतही मतदान केले. शिवसैनिक असलेला उमेदवार आम्ही दिला आहे असे परब म्हणाले.

Anil Parab
Assembly Election: महायुतीला 175 जागा मिळणार; अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा दावा

मनसे मराठी मतांचे विभाजन करणार

मनसे अनेक जागांवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांविरूद्ध निवडणूक लढवत आहे. मनसेमुळे भाजपचे मत विभागले जातील असे मत अनिल परब यांनी व्यक्त केले. मराठी मतांचे विभाजन करण्याचे काम मनसे करेल असेही ते म्हणाले. वांद्रे पूर्व, माहिम आणि वरळी या जागा प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. याजागांवर तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला या जागांवर धक्का बसला होता. आलेल्या अनुभवावरून सुधारणा करू असे मत परब यांनी व्यक्त केले. 

Anil Parab
Maharashtra Politics: मुंबईत रिपाईला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली आठवलेंची साथ; ठाकरे गटाची ताकद वाढणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा प्रश्न महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महाविकास आघाडीसाठी  मोठा प्रश्न आहे. धारावी पुनर्विकास हा केवळ धारावीचा मुद्दा नाही तर किमान सहा विधानसभा विभागांचा मुद्दा आहे. जिथे शेकडो एकर जमीन अदानी ग्रुपला मोफत देण्यात आली आहे आणि धारावीच्या रहिवाशांना जिथे पाठवले जाईल अशा सर्व जागा महायुतीच्या विरोधात मतदान करतील. हा प्रश्न केवळ धारावीपुरता मर्यादित नसून कुर्ला, मालाड पश्चिम, मुलुंड, घाटकोपर, शिवाजी नगर-मानखुर्द येथील समस्या आहे, असे मत अनिल परब यांनी व्यक्त केले. 

Edited by- नितीश गाडगे

Anil Parab
Assembly Election:निकालानंतर सत्ता समीकरण बदलणार? नवाब मलिकांपाठोपाठ वळसे पाटलांचे संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com