येवला: लोकसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाचा आज पाचवा टप्पा पार पडत आहे. राज्यातील मतदानाचा टप्पा हा अखेरचा आहे. सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली, परंतु अनेक ठिकाणी ईव्हीएमबिघाड झाल्याच्या घटना घडल्या. येवला तालुक्यातील सावरगाव आणि चिचोंडी खुर्द या केंद्रावर सुमारे एक तासांपासून ईव्हीएममध्ये बिघाड झालाय. मतदार जवळपासून एका तासापासून ताटकळत रांभेत उभे होते.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सकाळी सुरू झाली. मात्र मतदान सुरू होताच काही तासातच येवला तालुक्यातील सावरगाव आणि चिचोंडी खुर्द येथील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. यामुळे येथील मतदारांना एक तासभर ताटकळत राहावे लागले. येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी तात्काळ या ठिकाणी आपले पथक पाठवून यंत्रणा सुरू केल्यानंतर मतदान पुन्हा सुरू झाले.
धुळ्यात ईव्हीएम बंद पडल्याने उडाला गोंधळ
धुळे शहरातील एल. एम. सरदार हायस्कूल येथील ३६ नंबर बुथवर ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ उडाला. जवळपास २० ते २५ मिनिटं मशीन बंद असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला होता. लोकप्रतिनिधिंनीतर्फे प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तात्काळ बंद पडलेल्या मतदान केंद्रावर भेट देत ईव्हीएम मशीन बदलण्याची प्रक्रिया सुरू केली.
पवईत मतदानाचा घोळ; ईव्हीएम मशिन बंद
ईशान्य मुंबईतील पवईत मतदान केंद्रावर घोळ सुरू असल्याचं दिसत आहे. यावरून आदेश बांदेकर भडकले होते. पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रात मागील दोन तासांपासून लांबच लांब रांग लागल्या होत्या. ईव्हीएम बंद पडल्यानं कासवाच्या गतीने मतदान प्रक्रिया पार पडत होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.