Manoj Jarange Patil : 'मराठा आरक्षण चालत नाही, ओपन मतदारसंघात ओबीसी नेते का उभे करता? जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाच्या आंदोलन दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यानं पाहिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांना टोला लगावलाय.
Maratha Aandolak Manoj Jarange Patil
Maratha Aandolak Manoj Jarange Patil Saam Tv

Manoj Jarange Patil News:

मराठा आरक्षणाच्या आंदोलन दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यानं पाहिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांना टोला लगावलाय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओपन मतदारसंघ असताना ओबीसी नेत्यांना येथून का उभे राहायचे आहे? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

सध्या मराठवाड्यामध्ये बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीमधून महादेव जानकर हे ओबीसी उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. मनोज जरांगे पाटील परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. परभणीच्या यशवाडी येथे त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. ज्याला पाडायचे त्याला पाडा पण तो पुन्हा कधी उभा राहता कामा नये, असे जरांगे पाटील म्हणाले.

Maratha Aandolak Manoj Jarange Patil
Maharashtra Politics: जोपर्यंत मी रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

राज्यात १३-१४ मतदारसंघ असे आहेत ज्यामध्ये ओपनची संख्या जास्त आहे. तरीसुद्धा ओबीसी उमेदवार रिंगणात आहेत. याकडे जरांगे लक्ष वेधतात. दरम्यान, उपोषण करुन आरक्षण मिळत नसतं, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी गेवराईतील मेळाव्यात केलं होतं. त्यावरूनही जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. मी तुमच्या वाटेला गेलो नाही, तुम्ही माझ्या वाटेला जाऊ नका, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.

Maratha Aandolak Manoj Jarange Patil
Sharad Pawar: 10 वर्षांपासून तुमचं सरकार आणि तुम्ही आम्हाला विचारता काय केलं? शरद पवार भाजपवर कडाडले

लोकसभा निवडणुकीत उभा राहिलो असतो तर प्रचंड मतांनी निवडून आलो असतो, मात्र मी मूळ प्रश्नापासून दूर जाणार नाही,हे सांगायलाही जरांगे विसरले नाहीत. मराठ्यांच्या सभांना छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे या ओबीसी नेत्यांनी ओबीसी एल्गार मेळावा घेऊन प्रत्युत्तर दिलं होतं. लोकसभा निवडणूक प्रचारात आरक्षणाचा मुद्याही येत आहे. मतदारराजा मतांच्या माध्यमातून कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com