Who Is KL Sharma: काँग्रेसचे निष्ठावान, सोनिया गांधींचे विश्वासू.. अमेठीतून स्मृती इराणींना टक्कर देणारे के. एल शर्मा कोण?

Loksabha Election 2024: काँग्रेसने अमेठी या गांधी परिवाराच्या पारंपारिक मतदार संघातून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शर्मा यांची ही पहिलीच निवडणूक असेल.
Loksabha Election 2024:
Loksabha Election 2024: Saamtv

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेसने अमेठी या गांधी परिवाराच्या पारंपारिक मतदार संघातून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शर्मा यांची ही पहिलीच निवडणूक असेल. आतापर्यंत ते रायबरेलीचे खासदार प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. के. एल शर्मा हे सोनिया गांधी यांच्या जवळचे मानले जातात.

कोण आहेत के.एल शर्मा?

केएल शर्मा यांचे पूर्ण नाव किशोरी लाल शर्मा असून ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. मूळचे पंजाबमधील लुधियाना येथील ते रहिवासी आहेत. के. एल शर्मा 1983 मध्ये राजीव गांधींसोबत रायबरेली आणि अमेठीत दाखल झाले होते. पुढे राजीव गांधींच्या आकस्मिक निधनानंतर के. एल शर्मा हे गांधी परिवाराशी एकनिष्ठ राहिले.

1991 मध्ये राजीव गांधी यांच्या निधनानंतर शर्मा यांनी कधी शीला कौल यांचे निवडणुकीचे काम हाती घेतले तर कधी सतीश शर्मा यांना मदत केली. जेव्हा सोनिया गांधींनी पहिल्यांदा सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि अमेठीतून निवडणूक लढवली तेव्हा केएल शर्मा त्यांच्यासोबत अमेठीत आले.

Loksabha Election 2024:
Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

जेव्हा सोनिया गांधींनी राहुल गांधींसाठी अमेठीची जागा सोडली आणि त्या स्वतः रायबरेलीला आल्या. तेव्हा केएल शर्मा यांनी रायबरेली आणि अमेठी या दोन्ही लोकसभा जागांची जबाबदारी घेतली. मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते बाहेर पडले मात्र के. एल शर्मा एकनिष्ठ राहिले.

केएल शर्मा हे बिहारचे प्रभारी होते, तसेच ते ते पंजाब काँग्रेस समितीचे तसेच आयसीसीचे सदस्यही होते. कधीकाळी काँग्रेसच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी त्यांच्या हातात असायची. गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या के. एल शर्मा यांना अखेर त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाले आहे. ते अमेठीमधून स्मृती इराणी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

Loksabha Election 2024:
Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com