Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

Sangli Loksabha News: पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचे काम करा, अन्यथा माझा तुम्हाला शेवटचा रामराम असेल," अशा शब्दात कार्यकर्त्यांना देखील त्यांनी गर्भित इशारा दिला.
Sangli Loksabha News:
Sangli Loksabha News: Saamtv

सांगली|ता. ३ मे २०२४

विशाल पाटील यांच्या बंडखोरीनंतर सांगली लोकसभेत रंगत वाढू लागली आहे. विशाल पाटील यांना डावलल्यानंतर विश्वजित कदम यांनी पक्षश्रेष्ठींवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी यामागे जयंत पाटील यांचा हात असल्याचेही अप्रत्यक्षपणे म्हटले होते. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीही चंद्रहार पाटील यांंच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेतून विश्वजित कदम यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

"स्टेजवर एक आणि खाली एक भाषा करू नका, नाही तर पंचायत होईल,'' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. सांगली चंद्रावर पाटलांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंच्या उपस्थित पार पडलेल्या जाहीर सभेमध्ये बोलताना जयंत पाटलांनी हा इशारा दिला आहे.

तसेच " (Jayant Patil) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील ठणकावत माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचे काम करा, अन्यथा माझा तुम्हाला शेवटचा रामराम असेल," अशा शब्दात कार्यकर्त्यांना देखील जयंत पाटलांनी गर्भित इशारा दिला.

Sangli Loksabha News:
Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

दरम्यान, "सांगलीची जागा मी ठाकरे गटाला द्यायला लावली, असे बोलले जाते. मात्र माझा काहीही संबंध नाही. मला १४ जागा हव्या होत्या. मात्र आम्हाला १० जागा मिळाल्या, त्या चिंतेत मी होतो. माझा सांगलीच्या जागेशी काही संबंध नाही, तो ठाकरे गट आणि काँग्रेसमधील चर्चेचा विषय होता," असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Sangli Loksabha News:
Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com