Maharashtra Lok sabha: मोठी बातमी! वसंत मोरे यांना वंचित आघाडीकडून उमेदवारी; पुण्यातून लढवणार निवडणूक

Vasant More Vanchit Candidate: वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
Vanchit Bahujan Aaghadi Candidate Vasant More
Vanchit Bahujan Aaghadi Candidate Vasant MoreSaam Tv

(गिरीश कांबळे, मुंबई)

Maharashtra Lok Sabha Vanchit Bahujan Aaghadi Candidate List:

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. या यादीत ५ उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. या यादीतील तिसऱ्या नावाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे तिसरे नाव आहे वसंत मोरे यांचे. वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. (Latest News)

वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत २४ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. या यादीत त्यांनी बारातमतीमधील उमेदवारांची घोषणा केली नाहीये. वंचितकडून बारामती मतदारसंघात उमेदवा दिला जाणार नाहीये. म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडी आपला उमेदवार उभा करणार नसल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे यांनी आपलं व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवलंय.

"विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावी लागेल,नाही जमणार ते जमवाव लागेल मार्ग बदलावा लागेल तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकता" असं त्यांनी आपल्या स्टेट्समध्ये ठेवलंय. वसंत मोरे परवा वंचित बहुजन अघाडीत प्रवेश करणार आहेत.

वंचितने आतापर्यंत २४ उमेदवार जाहीर केलेत

1. प्रकाश आंबेडकर - अकोला

2. संजय केवात - भंडारा गोंदिया

3. प्राजक्ता पिल्लेवान - अमरावती

4. राजेश बेले - चंद्रपूर

5. वसंत मगर - बुलढाणा

6. हितेश मांडावी - गडचिरोली

7. राजेंद्र साळुंके - वर्धा

8. सुभाष पवार - यवतमाळ-वाशीम

9. डॉ. बी डी चव्हाण - हिंगोली

10. नरसिंहराव उदगिरकर - लातूर

11. राहुल गायकवाड - सोलापूर

12. रमेश बारसकर - माढा

13. मारुती जानकर - सातारा

14. अब्दुल रेहमान - धुळे

15. दादासाहेब पाटील - हातकणंगले

16. संजय ब्राम्हणे - रावेर

17. प्रभाकर बकले - जालना

18. अबुल हसन खान - मुंबई उत्तर मध्य

19. काका जोशी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग

20. अविनाश बोसिकर - नांदेड

21. बाबासाहेब उगले - परभणी

22. अफसर खान - संभाजीनगर

23. वसंत मोरे - पुणे

24. मंगलदास बागुल - शिरूर

Vanchit Bahujan Aaghadi Candidate Vasant More
Maharashtra Lok Sabha: धाराशिवमधील जागा राष्ट्रवादीला; तरीही महायुतीचा उमेदवार ठरेना, नेमका तिढा आहे तरी काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com