Archana Patil
Archana PatilSaam Tv

Maharashtra Lok Sabha: धाराशिवमधील जागा राष्ट्रवादीला; तरीही महायुतीचा उमेदवार ठरेना, नेमका तिढा आहे तरी काय?

Dharashiv Lok Sabha: भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा पक्षप्रवेश रखडलाय.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुंबई बाहेर असल्याचे कारण सांगत पक्ष प्रवेश पुढे ढलण्यात आलाय.
Published on

Lok Sabha Election Dharashiv Mahayuti Candidate Archana Patil :

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीची घोषणा पुन्हा एकदा रखडलीय. उमेदवाराची आज घोषणा होणार होती, परंतु काही कारणास्तव पुन्हा उमेदवारीची घोषणा करणं टाळण्यात आलंय. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली जाणार होती, मात्र पक्षप्रवेश रखडल्याने उमेदवारीची घोषणा करण्याचा मुहूर्तदेखील टळलाय. (Latest News)

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा पक्षप्रवेश रखडलाय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुंबई बाहेर असल्याचे कारण सांगत पक्ष प्रवेश पुढे ढलण्यात आलाय. अर्चना पाटील यांचे समर्थक मुंबई येथे ठाण मांडून आहेत.

त्या आज पक्षप्रवेश करणार होत्या. त्यांच्या या पक्षप्रवेशाला शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याने विरोध केल्याने त्यांचा प्रवेश रखडल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व कारणांमुळे अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश आणि उमेदवारीचा चेंडू पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात येणार होता. आज मंगळवारी त्यांना प्रवेश देऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली जाणार होती,मात्र अंतर्गत वाद आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मुंबईच्या बाहेर असल्याचे कारण देत त्यांचा प्रवेश लांबणीवर पडलाय.

दरम्यान या मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे महायुतीतून कोणाला उमेदवारी द्यायची, याचा तिढा अगदी सुरुवातीपासून निर्माण झालाय. उमेदवारी देण्यावरून महायुतीत अंतर्गत बारीक आवाजात वाद असल्याचं समोर आले आहे. हा मतदारसंघ भाजपला सुटेल, असे गृहीत धरून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी जय्यत तयारी केली होती.

परदेशी हे 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.त्या यंत्रणेच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने परदेशी यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला होता. मात्र मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे परदेशी उमेदवारीच्या स्पर्धेतून बाजूला झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मतदारसंघासाठी दावा केला. मात्र मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला आणि शिवसेनेला माघार घ्यावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार अनेक इच्छुक असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची हा तिढा अजून सुटलेला नाही.

दरम्यान परदेशी यांच्यासह भाजपकडून अनेकजण इच्छुक होते. शिवसेनेकडून माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड, पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत इच्छुक होते. राष्ट्रवादीकडून प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी तयारी सुरू केलीय. अजित पवार यांच्याकडून त्यांना सिग्नल मिळाला होता. पण काही काळानंतर त्यानंतर मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची नावे समोर आलीत. आता ही नावेही मागे पडली आहेत.

अर्चना पाटील यांचे नाव समोर आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आणि मग उमेदवारी जाहीर करायची असे ठरले होते. परंतु विरोधामुळे पक्षप्रवेश आणि उमेदवारीची घोषणा अजून रखडलीय. महायुतीतील शिंदे गटातील एका बड्या नेत्याने अर्चना पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर आक्षेप घेतल्याची चर्चा आहे. आयात उमेदवार कशाला द्यायचा, संबंधित पक्षातीलच उमेदवार द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्याकडून केली जात आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीची घोषणा पुन्हा एकदा टळलीय.

Archana Patil
Solapur News: सोलापूर लोकसभेत चुरस वाढली! वंचितनंतर MIMनेही डाव टाकला; माजी आमदार रमेश कदमांना उमेदवारी देणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com