Amit Shah: उद्धव ठाकरेंच्या पुत्र आणि शरद पवार यांच्या पुत्री मोहामुळे दोन्ही पक्षात फूट पडली: अमित शाह

Amit Shah on Uddhav Thackeray: ''उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पुत्र मोहामुळे शिवसेनेत फूट पडली आणि शरद पवार यांच्या पुत्री मोहामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली: अमित शाह
Amit Shah on Uddhav Thackeray and Sharad Pawar
Amit Shah on Uddhav Thackeray and Sharad PawarSaam Tv

Amit Shah on Uddhav Thackeray:

''उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पुत्र मोहामुळे शिवसेनेत फूट पडली आणि शरद पवार यांच्या पुत्री मोहामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली'', असं म्हणत भाजप नेते अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आज भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

काँग्रेसवर टीका करत अमित शाह म्हणाले की, येथीलच नेते (नाना पटोले) काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष झाले. यामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली, अर्धी शिवसेना आणि अर्धी राष्ट्रवादीने संपूर्ण काँग्रेसला अर्धी करण्याचं काम केलं आहे. हे तीन अर्धे पक्ष महाराष्ट्राचं भलं करू शकतात का?, असं ते म्हणाले आहेत.

Amit Shah on Uddhav Thackeray and Sharad Pawar
Salman Khan Firing: अब की बार गोळीबार सरकार, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर निशाणा

अमित शाह पुढे म्हणाले की, ''ही देशाची निवडणूक आहे. मोदींनी संपूर्ण जगात देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं आहे. अलीकडेच जी २० ची बैठक झाली. जगभरातील नेते महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक झाले.''

ते म्हणाले, ''मोदी म्हणाले आहे की, हे दहा वर्ष, काँग्रेसने खणलेला खड्डा भरण्यात गेले. पुढील पाच वर्षात महान भारताची रचण्याचं काम केलं जाईल. मोदींनी देशासमोर एक संकल्प ठेवलं आहे की, 2047 मध्ये आपण महान भारताची रचना करणार आहोत.''

Amit Shah on Uddhav Thackeray and Sharad Pawar
Pakistan News: लाहौरमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून सरबजीतच्या मारेकऱ्याची हत्या

भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''आम्ही आजच घोषणापत्र प्रसिद्ध केलं आहे. आमच्या संकल्पपत्रात म्हटलं आहे की, संपूर्ण देशात भाजप सरकार आल्यानंतर, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर समान नागरी संहिता लागू करण्यात येणार. संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकसोबत घेतल्या जातील. 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या 5 लाखांपर्यंतचा उपचाराचा खर्च सरकार उचलणार.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com