Assassination of Sarabjit singh killer In Lahore :
पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आलीय. अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराजची लाहौरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केलीय. हे वृत्त आज तक या हिंदी वृत्तसंस्थेने दिले आहे. अमीर सरफराजनेच आयएसआयच्या सूचनेवरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिक सरबजीतची हत्या केली होती. (Latest News)
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून अमीरने सरबजीतवर अत्याचार करून त्याची हत्या केली होती. पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात अमीर सरफराजने सरबजीतचा पॉलिथिनने गळा आवळून आणि मारहाण करून त्याची हत्या केली होती. पंजाबच्या सरबजीतला पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्कराने पकडले होते.
सरबजीत सिंग हे भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावात राहणारे शेतकरी होते. ३० ऑगस्ट १९९० रोजी ते नकळत पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेले होते. तेथे त्यांना पाकिस्तानी लष्कराने अटक केली होती.
लाहौर आणि फैसलाबाद येथील बॉम्बस्फोटांचा आरोप झाल्यानंतर सरबजीत सिंगला तुरुंगात टाकण्यात आले होते. या बॉम्ब हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. १९९१ मध्ये बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली सरबजीत सिंगला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सरबजीत सिंगवर लाहौरच्या कोट लखपत तुरुंगात कैद्यांनी हल्ला केला होता, त्यानंतर पाकिस्तानने त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.