Tushar Gandhi : 'वंचित भाजपची बी टीम, मतदान करू नका'; तुषार गांधींच्या आवाहनाने खळबळ

Tushar Gandhi Vs Prakash Ambedkar : वंचित भाजपची बी टीम आहे असे आरोप वंचित बहुजन आघाडीवर याआधी अनेकदा झालेत. खासकरून 2019 च्या निवडणुकीनंतर वंचित आणि एमआयएमवर हा आरोप करण्यात आला
Tushar Gandhi
Tushar Gandhi Saam Digital

वंचित भाजपची बी टीम आहे असे आरोप वंचित बहुजन आघाडीवर याआधी अनेकदा झालेत. खासकरून 2019 च्या निवडणुकीनंतर वंचित आणि एमआयएमवर हा आरोप करण्यात आला.. मात्र आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकरांच्या वंचित वर गंभीर आरोप केलेत. वंचित आणि एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यांना मतदान करू नका असं आवाहन तुषार गांधींनी केलंय. आणि एकच खळबळ उडालीय..तर वंचितने तुषार गांधींचे हे आरोप फेटाळून लावत जोरदार पलटवार केलाय.. हा प्रकाश आंबेडकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप वंचितने केलाय.

प्रिय तुषारजी,

तुमचे अलीकडील विधान केवळ अत्यंत बहिष्कृत आणि समस्याप्रधान नाही तर ते संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठी प्रयत्नांनाही नाकारणारे आहे... जे वर्ग, जात आणि धर्माच्या बंदीवान नाहीत. तुमच्या आजोबांची इंग्रजांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती पण स्पष्टपणे तुमचे विचार आणि राजकारण नाही. MVA ने VBA ला कसे वागवले हे तुम्हाला माहीत नाही का? त्यांचे राजकारण किती बहिष्कृत आहे हे तुम्हाला माहीत नाही का? MVA आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहीत नाही का? तुमचे राजकीय ज्ञान अस्तित्त्वात नसले तर कृपया मूर्खपणाचे बोलणे आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवणे टाळा. काळच सत्य सांगेल. खरं तर, चिन्हे आधीच आहेत. पण तुम्ही डोळे झाकलेले दिसत आहे...

Tushar Gandhi
Ambedkar Vs Gandhi : लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट; आंबेडकर विरुद्ध गांधी यांच्यात रंगणार सामना

तुषार गांधींकडून प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र मंचची स्थापना

महायुती, वंचित आणि एमआयएम मतदान न करण्याचे आवाहन करणार. महाविकास आघाडीला मतदान करा, महायुतीला मतदान करू नका असं आवाहन करणार. अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, चित्रपट कलावंत यांचा प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा आणि मतविभागणी होऊ न देण्यासाठी काम करणार. राज्यभर फिरून आणि सोशल मीडियावरून मतदारांना आवाहन करणार आहे.

Tushar Gandhi
Rahul Gandhi: भाजपचे नेते उघडपणे सांगतात की, ते सत्तेवर आल्यास संविधान बदलू: राहुल गांधी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com