Ravikant Tupkar Speech : राजकारण मर्दासारखं करा, आमच्या नादाला लागू नका; रविकांत तुपकरांचा विराेधकांना इशारा

Buldhana Lok Sabha Election : बुलढाणा लाेकसभा मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला मतदान हाेणार आहे. आज या मतदारसंघात प्रचाराचा समाराेप हाेणार आहे. रविकांत तुपकर यांनी सभा घेत त्यांच्या प्रचाराचा समाराेप केला.
ravikant tupkar criticizes prataprao jadhav buldhana lok sabha election
ravikant tupkar criticizes prataprao jadhav buldhana lok sabha electionSaam Digital
Published On

Ravikant Tupkar :

आमच्या नादाला लागू नका. प्रतापरावांना सांगतो, माझ्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर ईट का जबाब पत्थर से देंगे. मला बदनाम् करण्यासाठी खोटे व्हिडीओ व्हायरल करतील. तुम्हाला काय बाेलयाचे आहे ते माझ्यावर बाेला, विकासाच्या धाेरणावर बाेला. माझ्या आई, वडील, पत्नीसह चार वर्षाच्या मुलावर घाणरेडे आराेप कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा रविकांत तुपकर यांनी विराेधकांना दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुलढाणा लाेकसभा मतदारसंघात (buldhana lok sabha constituency) येत्या 26 एप्रिलला मतदान हाेणार आहे. आज या मतदारसंघात प्रचाराचा समाराेप हाेणार आहे. रविकांत तुपकर यांनी सभा घेत त्यांच्या प्रचाराचा समाराेप केला.

रविकांत तुपकर म्हणाले आम्हांला लोकांना भाड्याने आणायची गरज नाही. मुख्यमंत्र्यांच्या सभेला रावेर मधून माणसं आणली गेली. बुलढाणा जिल्ह्यातील कमी आणि बाहेरचे जास्त होते. इथे स्वतः हून लोक आले आहेत. गोविंदा पळून गेला, गोविंदावर काय वेळ आली हो, त्याचा कचरा झाला हो असेही तुपकर यांनी नमूद केले.

ravikant tupkar criticizes prataprao jadhav buldhana lok sabha election
Maharashtra Lok Sabha Election Phase 2 : महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात प्रचाराचा ताेफा आज थंडावणार; अमित शाह, राहूल गांधींच्या सभा

तुपकर पुढे म्हणाले मला थांबविण्यासाठी तुम्हांला 20, 20 मंत्री आणावे लागतात. स्टेजवर आता चार जणांचे प्रतापरावांचे फोन आले. प्रतापरावंचे कर्तृत्व चांगले असते तर असे फोन करावे लागले असते का असा प्रश्न तुपकरांनी उपस्थित केले. घरी घरी जाऊन सांगून राहिले की मला मत नाही दिलात चालेल पण तुपकरांना मत देऊ नका ही वेळ त्यांच्यावर आली.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

आमदार संजय गायकवाड म्हणतात की आंदोलन केले तर आईला रडवतो. माझ्या मायला काळीज आहे. तुमच्या सारखं दोन नंबरच्या पोटी जन्म घेतला नाही. बुलढाण्याच्या आमदाराचा तोल सुटलाय, वाटेल ते बोलताहेत. माझ्या कुटुंबावर बोलत आहेत. घाणेरडे आरोप करीत आहेत. मी कधीही कोणच्याही कुटुंबावर आरोप करणार नाही असे तुपकरांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

ravikant tupkar criticizes prataprao jadhav buldhana lok sabha election
Ratnagiri Sindhudurg Constituency: एका रात्रीत राणे विकासाचे महामेरू, दीपक केसरकर यांच्या बुद्धीची कीव येते : विनायक राऊत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com