शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांचे भाऊ किरण सामंत (Kiran Samant) यांनी ४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची रविवारी नागपूरमध्ये त्यांनी भेट घेतली होती. फडणवीस यांच्या भेटीनंतर आज त्यांनी ४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये (Ratnagiri-Sindhudurg Loksabha Election) महायुती नेमकी उमेदवारी कोणाला देतेय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण किरण सामंत यांच्याआधी नारायण राणे यांनी ४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अशामध्ये किरण सामंत यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. नारायण राणे यांनी देखील ४ उमेदवारी अर्ज घेतले आहे. किरण सामंत यांनी फडणवीस यांच्या भेटीनंतर हे ४ अर्ज घेतले आहेत. रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये महायुतीने अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केली नाही. अशातच नारायण राणे यांनी प्रचाराला देखील सुरूवात केली आहे. नारायण राणे यांच्या ठिकठिकाणी सभा होत आहेत.
किरण सामंत यांनी रविवारी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर कोकणात मोठी घडामोड घडताना दिसत आहे. नारायण राणे यांच्या पाठोपाठ किरण सामंत यांनी देखील ४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघातील तिढा आणखी वाढला. नारायण राणे की किरण सामंत नक्की उमेदवारी कोणाला मिळणार याकडे कोकणातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
किरण सामंत आणि नारायण राणे या दोघांना देखील सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र नारायण राणे यांनी प्रचाराला देखील सुरूवात केली आहे. महायु्तीचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मेळावा होत आहे. नारायण राणे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर किरण सामंत यांनी देखील चार उमेदवारी अर्ज घेतले आहे. आता नक्की उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अशामध्ये शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'महायुतीचे जे कोण उमेदवार असतील त्यांचेच काम करायचे आहे. हे सत्य आहे आम्हाला तसे आदेश आहेत. थोड्या दिवसांमध्ये प्रचार करणे जिक्रीचे होणार आहे. खूप मोठा मतदार संघ आहे. जर किरण सामंत यांचे नाव जाहीर झाले. तर तयारी असावी या अनुषंगाने फॉर्म घेतले आहेत. मोदी सरकारच येणार त्या दृष्टीकोनातून हालचाली चालू आहेत. इकडची उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी हा आमचा हक्क आहे. आमचं सगळं प्लॅनिंग तयार आहे. किरण सामंत कोणत्याही प्रकारे अपक्ष उमेदवारी करणार नाहीत.
दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची तोफ धडाडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची २४ एप्रिलला रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. एकीकडे नारायण राणे तर दुसरीकडे अमित शाहांचा झंझावाती दौरा होणार आहे. भाजपचे कोकणातील जागेवर विशेष लक्ष आहे. अमित शाहांच्या सभेमुळे नारायण राणेंच्या उमेद्वारीवर शिक्कामोर्तब? असल्याचे म्हटले जात आहे. पण आता किरण सामंत यांनी ४ उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे कोणाला उमेदवारी मिळतेय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.