Konkan Politics : मला संपवायला निघाला तर मी सोडेन का ? रामदास कदम (Video)

रामदास कदम यांनी मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले खेडेकर हा महाराष्ट्रातला सर्वात भ्रष्ट नगराध्यक्ष आहे. राज ठाकरेंचा फोन आला म्हणून मी शांत बसलो असेही त्यांनी स्पष्ट केले.
ramdas kadam statement on bjp ratnagiri sindhudurg constituency
ramdas kadam statement on bjp ratnagiri sindhudurg constituency Saam Digital

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election :

कोकणात शिवसेनेला जागा मिळेल अशी अपेक्षा होती, पण हरकत नाही याची कसर आम्ही विधानसभेत भरून काढू. सध्या दुधाची तहान ताकावर भगवतोय. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न, आम्हांला नारायण राणे (narayan rane) नाही तर नरेंद्र मोदी (pm modi) महत्त्वाचे असे शिवसेना नेते रामदास कदम (ramdas kadam) यांनी स्पष्ट केले. दरम्यान विधानसभेत शिवसेनेचा (shivsena) झंझावात दिसून येईल असेही रामदास कदम यांनी नमूद केले. (Maharashtra News)

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात महायुतीकडून नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. त्यानंतर रामदास कदम यांनी माध्यमांशी बाेलताना ही जागा शिवसेनेला मिळेल अशी अपेक्षा होती असे नमूद केले.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

दरम्यान भाजपचे स्थानिक नेते माझ्यावर टीका करत आहेत. भाजपाने माझ्या विरोधात काम केले तर त्याचे परिणाम राज्यात दिसतील असा इशारा देखील रामदास कदम यांनी भाजपाला दिला आहे.

ramdas kadam statement on bjp ratnagiri sindhudurg constituency
Lonavala Records Hottest Day of Season: लाेणावळ्यात उन्हाचा चटका वाढला; नागरिकांचा रसदार फळे, ताक, सरबताकडे कल

कदम यांनी मनसेचे नेते वैभव खेडेकर (vaibhav khedekar) यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले खेडेकर हा महाराष्ट्रातला सर्वात भ्रष्ट नगराध्यक्ष आहे. राज ठाकरेंचा फोन आला म्हणून मी शांत बसलो. अन्यथा अजून सात आठ गुन्हे दाखल झाले असते. मला संपवायला निघाला तर मी सोडेन का ? असा सवाल करत रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांना थेट इशारा दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वैभव खेडेकर हा नावाला मनसेत, प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे अनिल परब, सदानंद कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करतो असा गंभीर आराेपही रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांच्यावर केला.

Edited By : Siddharth Latkar

ramdas kadam statement on bjp ratnagiri sindhudurg constituency
Baramati Constituency: उत्तम जानकरांचे अजित पवारांना खुलं आव्हान, राष्ट्रवादी काय उत्तर देणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com