PM Modi in Uttarakhand : दहशतवाद्यांना आता घरात घुसून मारलं जातं; PM मोदी कडाडले

PM Modi at Uttarakhand rally : पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंड येथील ऋषिकेशमधील प्रचारसभेत काँग्रेसवर टीकेची तोफ डागली.
PM Modi at rishikesh in Uttarakhand rally
PM Modi at rishikesh in Uttarakhand rallySAAM TV

PM Modi Rally in Uttarakhand :

उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा-जेव्हा देशात कमकुवत सरकार आलं, तेव्हा दहशतवादानं देशात हातपाय पसरले. आज देशात बळकट सरकार आहे. आता दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जातं, असं मोदी म्हणाले. सात दशकांपासून जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० हटवू शकलो, हे मजबूत सरकारमुळे होऊ शकलं, असंही मोदींनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले की, 'आज देशात एक स्थिर सरकार आहे. जनतेने या सरकारचे काम बघितले आहे. मजबूत सरकारमुळे दहशतवाद संपुष्टात आला आहे. काँग्रेसचं (Congress) सरकार कधीच वन रँक-वन पेन्शन' लागू करू शकलं नाही. मात्र आमच्या सरकारनं ते लागू केलं. तो सैनिकांचा सन्मान आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये जवानांच्या सुरक्षेसाठी उपकरणे नव्हती. याआधी बुलेटप्रुफ जॅकेटचीही कमतरता होती. आज आधुनिक उपकरणे आहेत.'

'काँग्रेसचे कमकुवत सरकार सीमांवर आधुनिक सोयीसुविधा देऊ शकलं नाही. आजच्या घडीला सीमेवर रस्ते तयार झाले असल्याचे बघायला मिळेल. भूयार तयार झालेत. हे दशक उत्तराखंडचं असल्याचं काही दिवसांपूर्वी बाबा केदारनाथांचं दर्शन घेताना बोललो होतो,' असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

PM Modi at rishikesh in Uttarakhand rally
Loksabha Election : हिंदू अन् उत्तर भारतीय मतांसाठी भाजपचं राज्यात 'योगी कार्ड'; प्रत्येक टप्प्यात सभांचा धडाका

मिशन विकसित भारत, विकसित उत्तराखंड

उत्तराखंड देवभूमी आहे. इथे येणे ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. मी जेव्हा उत्तराखंडला येतो, तेव्हा तेव्हा माझ्या जुन्या आठवणी ताज्या होतात. आज उत्तराखंडचा वेगाने विकास होतोय. उत्तराखंड देवभूमी आहेच. त्याचबरोबर पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जात आहे. आमचे मिशन विकसित भारत आहे. पण जेव्हा विकसित उत्तराखंड होईल, तेव्हा आमचं हे मिशन यशस्वी होईल, असंही मोदी यांनी सांगितले.

PM Modi at rishikesh in Uttarakhand rally
PM Modi: लोकशाही केवळ आपल्या राज्यघटनेतच नाही तर भारतीयांच्या रक्तात: पंतप्रधान मोदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com