PM Modi: युवा, महिला, गरीब, तृतीयपंथी; संकल्पपत्रात पंतप्रधान मोदींनी कोणत्या योजनांच्या घोषणा केल्या?

PM Narendra Modi On BJP Sankalp Patra: लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा समोर आला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज भाजपच्या जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam Tv

लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा समोर आला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज भाजपच्या जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. आजचा दिवस शुभ आहे. देशातील अनेक राज्यात नवीन वर्षाचा आनंद आहे. केरळ, तामिळनाडू, ओडिसा, बंगालमध्ये शुभ दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवरात्रीच्या (PM Narendra Modi On BJP Sankalp Patra) सहाव्या दिवशी देवीची पूजा करतो. आई कात्यायनीच्या दोन्ही हाती कमळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या शुभ दिनी भाजपचं संकल्पपत्र समोर ठेवलं आहे.

देशातील अनेक सक्रिय ((PM Narendra Modi) नागरिकांनी हे संकल्पपत्र तयार करण्यासाठी सूचना पाठवल्या होत्या. विकसित भारताच्या ४ स्तंभावर हे संकलपत्र फोकस करत आहे. भाजपच्या संकल्पपत्रात युवा भारताच्या युवा संकल्पाची युवा आकांशा आहे. भाजपने दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण केलेली (BJP Manifesto) आहेत. सबका साथ सबका विकास हेच भाजप ध्येय असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तृतीयपंथीयांना प्रतिष्ठा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. १ कोटी लखपती दीदी बनल्या आहेत.आता ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी दिली आहे. गावच्या मुलींना पायलट बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

मोफत राशनची योजना पुढचे ५ वर्ष सुरू असेल. गरिबाच्या जेवणाच ताट त्याच्या मनाला समाधान देणार असेल, ही मोदींची गॅरंटी आहे. आयुष्मान भारतमध्ये मोफत उपचार मिळत राहतील. भाजपने संकल्प केला आहे, ७० वर्षाच्या पुढील व्यक्तीला आयुष्मान योजनेत आणल जाणार आहे. त्याला ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. महिला खेळाडूंना पुढे जाण्यासाठी विशेष सुविधा बनवल्या जाणार आहे. कॅन्सरमुक्तीसाठी योजना चालवणार आहे. ग्रामीण भागातील सगळ्यांना सशक्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पीएम किसान योजनेचा फायदा पुढे सुरू राहील. देशातील सहकारी संस्थांची संख्या वाढवली आहे. आत्मनिर्भरतेसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक प्रकारची मदत करेल. शेतकऱ्यांना मोतीच्या शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. भाजपचा संकल्प भारताला फूड प्रोसेसिंग हब बनवणारा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हटले आहेत.

परिवार वाढत असल्याने आणखी ३ कोटी घर बांधण्याचा संकल्प करत आहोत. पाईपने प्रत्येक घरी गॅस पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. मुद्रा योजनेतील निधीची मर्यादा २० लाख करण्यात येणार आहे. मोदींनी प्रधानमंत्री अवास योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला, (Politics) किसान योजनेचं योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला आणि छत्तीसगडच्या बस्तरमधून आलेल्या महिलेला उज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांना संकल्प पत्र दिलं आहे. पुढच्या वर्षी बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाणार. सर्वांत जुनी भाषा तमिळ भाषा देशाची गौरव भाषा आहे. भाजप इको टुरिझमचे सेंटर बनवणार आहे.

PM Narendra Modi
Nanded Politics: अशोक चव्हाण यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली; वसंतराव चव्हाण यांचा गौप्यस्फोट

पुढच्या वर्षी बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाणार. सर्वांत जुनी भाषा तमिळ भाषा देशाची गौरव भाषा आहे. भाजप इको टुरिझमचे सेंटर बनवणार आहे. अनेक लहान लहान अनेक गोष्टींचा विचार करून आम्ही योजना तयार केल्या आहेत. 6G वर काम सुरू आहे. जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन मिळतील यासाठी प्रयत्न करत आहोत. सोशल, फिजिकल, डिजिटलचा विस्तार करणार आहे.

अजेंडा तयार करण्यासाठी भाजपने नुकतीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने अनेक बैठका घेऊन जाहीरनामा अंतिम केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, (Lok Sabha Election 2024) पीयूष गोयल, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू आणि अर्जुनराम मेघवाल यांच्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि माजी केंद्रीय मंत्री रवींद्रभाई पटेल यांच्यासह एकूण २७ नेते सहभागी झाले होते. शंकर प्रसाद हे या समितीचे सदस्य (Lok Sabha) आहेत.

PM Narendra Modi
Maharashtra Politics 2024 : नरेंद्र मोदी-राज ठाकरे येणार एकाच मंचावर? शिंदे, फडणवीस, अजितदादांसाठी घेणार सभा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com