PM Modi Interview: आम्ही 2047 साठी काम करत आहोत, माझे निर्णय कोणाला घाबरवण्यासाठी नाहीत: नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Live: ''आम्ही 2047 साठी काम करत आहोत. काँग्रेसच्या 50 वर्षांच्या आणि माझ्या 10 वर्षांच्या कामाची तुलना करा'', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
Pm Modi Lok Sabha Election Interview
Pm Modi Lok Sabha Election InterviewSaam Tv

Pm Modi Lok Sabha Election Interview:

काँग्रेसने 5 ते 6 दशकं केलेली कामं आणि माझी फक्त मागच्या 10 वर्षातली कामं, याची तुलना लोकांनी करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बोलताना देशातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची वक्तव्य केली.

लोकशाहीमध्ये निवडणुकांचा उत्सव साजरा केला पाहिजे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. निवडणुकांना खिलाडूवृत्तीने घेतलं पाहिजे, असा सल्ला नरेंद्र मोदी यांनी दिला. 2047 सालापर्यंत भारत हा विकसीत देश झालेला असेल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''माझे निर्णय कोणाला घाबरवण्यासाठी नाहीत. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. देशासाठी खूप काही करायचे आहे.''

Pm Modi Lok Sabha Election Interview
PM Modi Interview: 'वन नेशन, वन इलेक्शन'वर नरेंद्र मोदी यांनी केलं मोठं वक्तव्य

ईडीचं केलं कौतुक

ईडीच्या कामाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, ईडीने नोंदवलेले बहुतांश खटले अशा लोकांविरुद्ध आहेत, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. ते म्हणाले की, प्रामाणिक माणसाला भीती नसते. पण भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना पापाची भीती असते.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर काय म्हणाले मोदी?

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, ''विरोधकांचा जाहीरनामा देशात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांच्या आकांक्षा धुळीस मिळवतो. जर आपण याचं संपूर्ण विश्लेषण केलं तर, नवीन मतदारांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी आहे. हा जाहीरनामा त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करेल.

Pm Modi Lok Sabha Election Interview
Pm Modi On Electoral Bonds: इलेक्टोरल बाँड्सचा निर्णय चुकीचा होता का? PM मोदींनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "एक झटक्यात मी गरिबी हटवणार, असं म्हणताना मी एका नेत्याला ऐकलं. ज्यांनी 5 ते 6 दशके देशावर राज्य केलं. ते आज एका झटक्यात गरिबी हटवू, असे म्हणत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com