PM Narendra Modi: मतपेट्या लुटणाऱ्यांना चोख उत्तर मिळालं! EVM-VVPAT वरील सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर PM मोदींचा हल्लाबोल

Pm Mod Criticized Oppositio: देशातील निवडणूक प्रक्रियेचे आणि निवडणुकीतील तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक करत आहेत. तेव्हा ही लोकं स्वार्थासाठी ईव्हीएमला बदनाम करण्यात व्यस्त आहेत.', अशी टीका पीएम मोदींनी विरोधकांवर केली.
PM Narendra Modi Criticized Opposition
PM Narendra ModiSaam TV

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) शुक्रवारी ईव्हीएम-व्हीव्हीपीएटीवर (EVM- VVPAT) दिलेल्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधकांसाठी मोठा धक्का असल्याचा टोला पीएम मोदींनी विरोधकांना लगावला. बिहारमधील सभेदरम्यान पीएम मोदींनी विरोधकांवर निशाण साधला. 'लोकांच्या मनामध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सच्या विश्वासार्हतेबद्दल शंका पेरल्या जात आहेत. आज संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीचे, देशातील निवडणूक प्रक्रियेचे आणि निवडणुकीतील तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक करत आहेत. तेव्हा ही लोकं स्वार्थासाठी ईव्हीएमला बदनाम करण्यात व्यस्त आहेत.', अशी टीका पीएम मोदींनी विरोधकांवर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बिहारमधील अररिया येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. 'देशाच्या लोकशाहीची आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद बघा, मतपेट्या लुटू पाहणाऱ्यांना आज सुप्रीम कोर्टाने ऐवढा मोठा धक्का दिला आही की त्यांच्या सर्व स्वप्नांनाचा चुराडा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आज मतपेट्या लुटणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, बॅटेल पेपरचे जुने युग परत येणार नाही.', असे म्हणत पीएम मोदींनी विरोधकांना टोला लगावला आहे.

PM Narendra Modi Criticized Opposition
Surat Lok Sabha Election 2024: सूरत लोकसभा मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट; NOTAला उमेदवार माना, सुप्रीम कोर्टात याचिका

पीएम मोदींनी या सभेमध्ये एनडीए आणि इंडिया ब्लॉकच्या उद्दिष्टांमधील फरक सांगितला. 'एनडीए लोकांचे सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवत असताना इंडिया ब्लॉक स्वत:च्या फायद्यासाठी राष्ट्र आणि येथील नागरिकांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत.', अशी टीका पीएम मोदींनी केली. तसंच, 'आजचा दिवस लोकशाहीसाठी आनंदाचा दिवस आहे. यापूर्वी राजद आणि काँग्रेसच्या राजवटीत बॅलेट पेपरच्या नावावर जनतेच्या हक्काची लूट करण्यात आली होती. त्यांच्या सरकारमध्ये निवडणुकीत मतांची लूट केली जाते. म्हणूनच त्यांना ईव्हीएम काढून टाकायचे आहे. ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण करण्याचे पाप इंडिया आघाडीच्या प्रत्येक नेत्याने केले आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.

PM Narendra Modi Criticized Opposition
Rahul Gandhi : PM मोदी घाबरलेत, भर सभेत स्टेजवर रडू शकतात - राहुल गांधी

पीएम मोदींनी पुढे असे सांगितले की, 'अररिया आणि सुपॉलचे हे प्रेम माझ्यासाठी खूप मोठी ऊर्जा आहे. ती खूप मोठी शक्ती आहे. तुमचे कर्ज फेडण्यासाठी मी आणखी मेहनत करीन आणि तिसऱ्या टर्ममध्ये देश तुमच्या हिताचे आणि देशहिताचे मोठे निर्णय घेणार आहे अशी ग्वाही मी देतो.' दरम्यान, सुप्रीम कोर्टाने व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) स्लिपसह इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (EVM) वापरून टाकलेल्या मतांचे 100 टक्के क्रॉस-व्हेरिफिकेशन मागणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.

PM Narendra Modi Criticized Opposition
Uttar Pradesh News: हॉस्पिटलचे बिल भरायला नव्हते पैसे, गरीब आई-वडिलांनी नवजात बाळालाच विकले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com