Maharashtra Election: पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढलं; ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात

Beed Lok Sabha Constituency: ओबीसी बहुजन पार्टीने बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं टेन्शन वाढलं आहे.
पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढलं; ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात
Pankja MundeSaam TV

विनोद जिरे साम टीव्ही, बीड

ओबीसी बहुजन पार्टीने (OBC Bahujan Party) बीडमध्ये आपला उमेदवार दिला आहे. पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्या उमेदवारीनंतर आता ओबीसी बहुजन पार्टीने देखील बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार (Maharashtra Election) दिला आहे. त्यामुळे ओबीसी आंदोलनामध्ये प्रमुख चेहरा असलेले प्राध्यापक टी.पी मुंडे (T P Munde) यांच्या नेतृत्वामध्ये बीडची निवडणूक लढली जाणार आहे. यामुळे पंकजा मुंडे यांचं टेन्शन वाढलं (Beed Lok Sabha) आहे.

ओबीसींवर होणारा अन्याय थांबावा, यासाठी ओबीसीचे प्रश्न संसदेत मांडता यावे, यासाठी उमेदवार दिले आहेत. आम्हाला छगन भुजबळ यांचा आशीर्वाद असल्याचं देखील टी.पी मुंडे यांनी म्हटलं (Munde Vs Munde Fight In Beed) आहे. त्याचबरोबर आम्ही पंकजा मुंडेंना ओबीसी मानत नाहीत. त्यांनी विकास आणला नाही तर भकास केलंय, रेल्वे कुठंय सांगा ? असा सवाल देखील त्यांनी पंकजा मुंडेंना केला (Beed Politics) आहे.

तर यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला (Beed Lok Sabha Constituency) आहे. बीडमध्ये जाळपोळ झाली त्यावेळी आमदार व्यावसायिकांनी, स्वतःची घर स्वतः जाळलेत का? असा सवाल देखील टी.पी मुंडे यांनी मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना केला (Maharashtra Politics) आहे. निवडणूकांच्या अनुषंगाने राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढलं; ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात
Akola Politics: १० वर्षांत काय केलं? मतदान का करायचं? ग्रामस्थांनी भाजप उमेदवाराला विचारला जाब

बीडमध्ये आता 'मुंडे विरूद्ध मुंडे' अशी निवडणूक आता होणार (Lok Sabha 2024) आहे. त्यामुळे सगळ्यांचं बीड लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात (Lok Sabha Election) आली. त्यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे देखील आता रिंगणात उतरल्याचं दिसतंय. आता ओबीसी बहुजन पार्टीने देखील त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. बीडमध्ये चांगलीच राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत (Lok Sabha) आहे.

पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढलं; ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात
Maharashtra Politics: ठाकरेंचीच शिवसेना असली, खोटे गोटे तुमचा कपाळमोक्ष करतील; संजय राऊतांचं अमित शहांना उत्तर

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com