Maharashtra Election: पंकजा-धनंजय मुंडेंना साखर कारखाना आयता मिळालाय; बजरंग सोनवणे यांची टीका

Maharashatra Loksabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे हे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत. बजरंग सोनवणे पंकजा मुंडे याच्याविरोधात मोठं आवाहन उभारत आहेत.
Maharashatra Loksabha Election
Beed LokSabha Election Pankaja Mundesaam Tv
Published On

Beed LokSabha Election Pankaja Munde:

महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेकरिता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी प्रचार सुरू केलाय. आज सोनवणे यांनी परळी विधानसभा मतदारसंघाची पहिली बैठक घेतली. या बैठकीतून सोनवणे यांनी मुंडे बहीण भावावर कडाडून टीका केली.(Latest News)

परळीतील वैजनाथ सहकारी साखर कारखाना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उभा केला, परंतु त्यांच्यानंतर धनंजय आणि पंकजा मुंडे यांना ते आयतं मिळालं आहे. त्यांना त्याचं काय कळणार आहे, त्याची काय किंमत आहे. यांना सर्व फुकट आणि आयतं मिळालंय. २००९ ला ज्यावेळी पंकजा मुंडे विधानसभेकरिता उभ्या राहिल्या, त्यावेळी त्यांची राजकीय कारकीर्द काय होती ? असा सवाल सोनवणे यांनी केला. माझी उंची आणि लायकी काढली जाते, पण मी १९९२ ला निवडणूक लढवलीय. राजकीय अनुभव मलाच जास्त असल्याचा दावा सोनवणे यांनी यावेळी केलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम्ही एमआरईजीएसचे कार्यकर्ते आहोत. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही. यात आमची चूक नाही, माझे वडील शेतकरी आहेत. त्याचा मला रास्त अभिमान आहे. मला राजकीय जन्म देणारे ही मायबाप जनता आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांच्यावर परळीतून टीकास्त्र सोडलं.

कोण आहेत बजरंग सोनवणे

येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून सोनवणे यांनी साखर कारखान्यावर काम करत जनसंपर्क निर्माण केला. यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय. तसेच ते बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील राहिलेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे आणि अजित पवारांसोबत होते. मात्र काही महिन्यातच त्यांनी घड्याळ सोडून तुतारी हातामध्ये घेतली आणि शरद पवारांच्या गटात सामील झाले.

बजरंग सोनवणे यांनी २०१९ मध्ये झालेल्या बीड लोकसभेत भाजपच्या प्रीतम मुंडे यांच्याविरोधात दमदार फाईट दिली होती. या लोकसभेत प्रीतम मुंडे यांना ६७८,१७५ तर सोनवणे यांना ५,०९,८०७ मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांचे नाव होते.

Maharashatra Loksabha Election
Nana Patole: भाजपने इतर पक्षातील लोकांना फोडून आपलं घर सजविण्याचे काम केलं, नाना पटोले यांचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com