Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; अमोल कोल्हे, जयंत पाटील, रोहित पवारांसह ४० दिग्गजांचा समावेश

Maharashtra Politics News: शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.
Maharashtra Politics| Sharad Pawar News
Maharashtra Politics| Sharad Pawar NewsSaamtv
Published On

NCP SharadChandra Pawar Party Star Campaigners:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.

शरद पवार, अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक...

लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभेच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. या यादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे.

आज वर्ध्याचे उमेदवार भरणार अर्ज..

आज महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aaghadi) राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे उमेदवार अमर काळे उमेदवारी अर्ज करणार दाखल करणार आहेत. अमर काळे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics| Sharad Pawar News
Bhadgaon Crime News : प्रियकराच्या मदतीने पत्नीचे भयानक कृत्य; पतीच्या अपघाताचा केला बनाव

शरद पवार गटाकडून पाच उमेदवार जाहीर...

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांचे पाच उमेदवार जाहीर केले आहेत.  यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून सुप्रिया सुळे, नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. (Maharashtra Loksabha Election 2024)

Maharashtra Politics| Sharad Pawar News
Tragic Incident : घरी कोणी नसताना घडले अघटीत; ११ वर्षीय मुलाचा मृत्यू, अमळनेरमधील दुर्दैवी घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com