Rohit Pawar: निवडणूक आयोगाकडे भाजपने तक्रार केल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया , म्हणाले ...

Rohit Pawar Reaction Against Election Commission Complaint: रोहित पवार पत्रकार परिषदेमध्ये प्रतिकात्मकरित्या जिवंत खेकडा घेऊन आले होते. प्राण्याचा वापर केल्याने निषेध दर्शवत ‘पेटा इंडिया’ने त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. आता निवडणूक आयोगाकडील तक्रारीविरोधात रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSaam Tv

Maharashtra Politics Lok Sabha Election

नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) पत्रकार परिषदेमध्ये प्रतिकात्मकरित्या जिवंत खेकडा घेऊन आले होते. प्राण्याचा गैरवापर केल्याने निषेध दर्शवत ‘पेटा इंडिया’ने (पीपल फाॅर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स) त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. आता निवडणूक आयोगाकडील तक्रारीविरोधात रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Lok sabha Election)

रोहित पवार (NCP Rohit Pawar ) यांनी पत्रकार परिषदेमध्ये खेकडा घेऊन आल्यामुळे भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली होती. यावर आता रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावर त्यांनी X या सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया (Election Commission Complaint) दिली आहे. त्यांनी त्या खेकड्याचं नेमकं काय केलं? हे देखील रोहित पवार यांनी सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहित पवारांनी X या सोशल मीडियावर पोस्ट केलं की, भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत मी खेकडा (Rohit Pawar News) दाखवला.

वास्तविक मी दाखवलेला खेकडा हॉटेलमध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणार होता. नंतर तो नदीत सोडून दिला, त्यामुळं खरंतर त्या खेकड्याचा जीव वाचला. पण तिकडं भाजपची यामुळं तडफड (Maharashtra Politics Lok Sabha Election) सुरू झाली आहे. याचं कायदेशीर उत्तर मी देईलच, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Rohit Pawar  News
Rohit Pawar NewsSaam Tv
Rohit Pawar
Rohit Pawar News: पिक्चर अभी बाकी है; अनेक आमदार साहेबांच्या संपर्कात... रोहित पवार यांचा मोठा दावा

पेटा या प्राणीमित्र संघटनेने रोहित पवारांविरोधात निवडणूक आयोग आणि शरद पवार यांना पत्र लिहून राजकीय प्रचारासाठी प्राण्याला त्रास दिल्याची तक्रार केली आहे. पेटाने आपल्या पत्रात म्हटलंय (Lok Sabha Election) की, सन २०१३ मध्ये जाहीर अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक प्रचारादम्यान प्राण्यांच्या वापरावर बंदी घातली होता.

उल्लंघन करणाऱ्यांविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. पेटाने रोहित पवारांना देखील पत्र लिहून त्यांच्याकडील खेकडा आमच्याकडे ( Lok Sabha Election 2024) सोपवावा, आम्ही त्याची देखभाल करु, असे पत्रात म्हटले आहे.

Rohit Pawar
Rohit Pawar News: ठरलं! निलेश लंके आपले नगरचे उमेदवार; रोहित पवारांचे सूचक विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com