Rohit Pawar News: ठरलं! निलेश लंके आपले नगरचे उमेदवार; रोहित पवारांचे सूचक विधान

Maharashtra Loksabha Election 2024: हा तर ट्रेलर पिक्चर अभी बाकी है! अनेक आमदार आमच्या आणि साहेबांच्या संपर्कात आहेत, असे म्हणत अनेक जणांना परत घेऊ.." असे मोठे विधानही रोहित पवार यांनी केले.
Maharashtra Loksabha Election 2024:
Maharashtra Loksabha Election 2024:Saamtv

नितीन पाटणकर, पुणे|ता. ३० मार्च २०२४

Maharashtra Politics News:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता निलेश लंके हे नगर दक्षिणमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही शिक्कामोर्तब केले असून निलेश लंके हे नगरचे उमेदवार असतील, असे स्पष्ट केले आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

काय म्हणाले रोहित पवार?

"निलेश लंके (Nilesh Lanke) आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत काल त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचं मन तिकडं जमत नव्हते ते लोकांशी बोलले आणि त्यांनी मत बनवलं. लोक साहेबांसोबत आहेत. हा तर ट्रेलर पिक्चर अभी बाकी है! अनेक आमदार आमच्या आणि साहेबांच्या संपर्कात आहेत, असे म्हणत अनेक जणांना परत घेऊ.." असे मोठे विधानही रोहित पवार यांनी केले.

भाजपला खोचक टोला...

तसेच "आपलं वातावरण लई भारी आहे. विजय आपलाच आहे. सगळ्यांनी टार्गेट घेऊन काम करा. अख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण भारी आहे, भाजप (BJP) आता घाबरला आहे. घर आणि पक्ष फोडत आहेत, एक आमदार असलेल्या पक्षाला दिल्लीला बोलावलं जात आहे," असा खोचक टोलाही रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लगावला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Loksabha Election 2024:
Buldhana News: दुपारी अर्ज, संध्याकाळी उमेदवारी; बुलडाण्याची जागा शिवसेनेला कशी मिळाली, संजय गायकवाड यांनी सांगितली इनसाइड स्टोरी

बारामतीची निवडणूक महत्वाची...

"ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. बारामती लोकसभा मतदार संघावर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. भाजपकडून आपल्या विचारावर घाव घालण्याचा प्रयत्न होत आहे. 2014 मध्ये यश आलं नाही, आता त्यांनी खूप मोठी ताकत लावली आहे. पुरोगामी आणि प्रतिगामी अशी ही लढाई आहे, आता सुप्रिया सुळे किती मतांनी निवडून येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे," असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

Maharashtra Loksabha Election 2024:
Lok Sabha Election 2024: घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना 'इलेक्शन ड्युटी'; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com