Narayan Rane: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा कायम, उमेदवारीच्या घोषणेआधीच नारायण राणेंनी घेतले चार उमेदवारी अर्ज

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency: रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. मात्र महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आलीय.
Narayan Rane
Narayan RaneSaam Tv

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency:

रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. मात्र महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आलीय. तर सिंधुदुर्गच्या विजयी जागेवर दावा सोडणार नसल्याचं उदय सामंत यांनी आधीच स्पष्ट केलंय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नागपुरात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरीतून लढण्यासाठी मी इच्छुक असल्याचं फडणवीसांना सांगणार असल्याची प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिलीय. तसंच सिंधुदुर्ग-रत्नागिरीत धनुष्यबाणाशिवाय पर्याय नसून, फडणवीस घेतील तो निर्णय मान्य असेल, असंही किरण सामंत यांनी म्हटलंय.

Narayan Rane
Kiran Samant: देवेंद्र फडणवीस निवडणूक लढू नका म्हणाले, तर मी थांबणार; किरण सामंत स्पष्टच म्हणाले...

दुसरीकडे नारायण राणे सामंत बंधूंना एकटं पाडण्यासाठी फिल्डिंग लावतायत. दीपक केसरकरांना आपल्या गोटात घेण्यासाठी नारायण राणेंनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलीय. राजकीय हेवेदावे बाजुला ठेवून तब्बल 10 ते 12 वर्षानंतर नारायण राणे केसरकरांच्या भेटीसाठी आले.

Narayan Rane
Amit Shah: उद्धव ठाकरेंच्या पुत्र आणि शरद पवार यांच्या पुत्री मोहामुळे दोन्ही पक्षात फूट पडली: अमित शाह

उमेदवारी मिळवण्यासाठी किरण सामंतांची धडपड सुरु आहे. तर उमेदवारीची घोषणा होण्याआधीच नारायण राणेंनी प्रचाराचा नारळ फोडलाय. दोघांनीही उमेदवारीसाठी आपापल्या नेत्यांकडे गा-हाणं घातलंय. आता रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीचा कौल कुणाच्या बाजुला लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com