Loksabha Election: ब्रेकिंग! ठाकरे गट भाजपला धक्का देणार? तिकीट कापलेले विद्यमान खासदार थेट 'मातोश्री'वर; शिवबंधन बांधण्याच्या चर्चा

Unmesh Patil Meet Uddhav Thackeray: पक्षाकडून तिकीट नाकारलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. पक्षाने तिकीट नाकारल्याने उन्मेश पाटील हे नाराज असून लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Loksabha Election 2024
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Loksabha Election 2024SAAM TV

गिरीश कांबळे, मुंबई|ता. २ एप्रिल २०२४

Maharashtra Loksabha Election 2024:

राज्यात लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे लोकसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपने तिकीट नाकारलेले जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने उन्मेश पाटील हे नाराज असून लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

उन्मेष पाटील मातोश्रीवर!

भारतीय जनता पक्षाने (BJP) जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. अशातच आज उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांची भेट घेतल्याने उन्मेश पाटील हे ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

उद्या पक्षप्रवेश?

सामना कार्यालयात संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उन्मेश पाटील थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भेटीसाठी दाखल झाले आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत, उन्मेष पाटील, करण पवार आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यात बैठक झाली. उन्मेष पाटील हे उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून जळगावमधून उन्मेष पाटील किंवा करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Loksabha Election 2024
Navi Mumbai Fire : नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग; सर्वत्र धुराचे लोट, अग्निशमन दल घटनास्थळी

संजय राऊत यांचे सूचक विधान...

"उन्मेष पाटील यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता. अनेक वर्ष ते भाजपाचे काम करत आहेत. अनेक चळवळीशी ते जोडलेले आहेत. त्यांची प्रतिमा उत्तम आहे, तरी देखील भाजपने त्यांची उमेदवारी कापली. त्याबद्दल आम्हाला आश्चर्य आहे, असे म्हणत जळगाव जिल्ह्यातले त्यांचे शेकडो सहकारी हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. उद्यापर्यंत समजेल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Loksabha Election 2024
Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com