Loksabha Election: महाविकास आघाडीचं ठरलं! लोकसभेच्या ४८ जागांचा फॉर्म्युला जाहीर; सांगलीत कोण?

Mahavikas Aaghadi Joint Press Conference Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी, तसेच मुंबईतील काही जागांवरुन वाद सुरू आहे.
Mahavikas Aaghadi Joint Press Conference:
Mahavikas Aaghadi Joint Press Conference:Saamtv

गिरीश कांबळे, मुंबई|ता. ९ एप्रिल २०२४

Mahavikas Aaghadi Joint Press Conference:

आज महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवालय कार्यालयात पार पडत आहे. या पत्रकार परिषदेला  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,  ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तसेच इतर घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमधून शिवसेना - 21, काँग्रेस - 17, राष्ट्रवादी - 10 असा फॉर्म्युला फिक्स करण्यात आला आहे. (Loksabha Election 2024)

महाविकास आघाडीचे संपूर्ण जागा वाटप...

काँग्रेसच्या जागा: नंदुरबार, धुळे, अकोला,अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया ,गडचिरोली चिमूर,चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर , रामटेक, उत्तर मुंबई अशा १७ जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गट- बारामती, शिरूर, सातारा, दिंडोरी, माढा,रावेर, अहमदनगर, बीड, वर्धा, भिवंडी, या १० जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढवणार आहे.

ठाकरे गट: बुलढाणा, यवतमाळ, मावळ, सांगली, हिंगोली, संभाजीनगर, धाराशिव, शिर्डी, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण, कल्याण, हातकणंगले, पालघर, जळगाव, अशा २१ जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्या आहेत. (mahavikas aaghadi candidates list)

Mahavikas Aaghadi Joint Press Conference:
Loksabha Election: माढ्यात उमेदवार मिळेना; महाविकास आघाडीवर वाईट वेळ... रणजितसिंह निंबाळकरांचा खोचक टोला

सांगलीत चंद्रहार पाटील!

दरम्यान,  महाविकास आघाडीमध्ये सांगली तसेच भिवंडीच्या जागेवरुन वाद सुरू होता. सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच सांगलीमधून काँग्रेसचे विशाल पाटीलही लढण्यास इच्छुक होते. मात्र आजच्या पत्रकार परिषदेत याबाबत अंतिम निर्णय जाहीर झाला असून ही जागा ठाकरे गटाकडे गेली आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील हेच सांगलीतून उमेदवार असतील, हे स्पष्ट झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahavikas Aaghadi Joint Press Conference:
Maharashta Politics: कॉंग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com