Loksabha Election: माढ्यात उमेदवार मिळेना; महाविकास आघाडीवर वाईट वेळ... रणजितसिंह निंबाळकरांचा खोचक टोला

Maharashtra Politics News: माढ्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. यावरुन रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
 ranjitsinh naik nimbalkar madha lok sabha constituency
ranjitsinh naik nimbalkar madha lok sabha constituencysaam tv

Madha Loksabha Constituency News:

माढा मतदार संघात महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी मिळताच रणजित निंबाळकर यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र माढ्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. यावरुन रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून उमेदवार अजून निश्चित करण्यात आलेली नाही. शरद पवार गटाकडून माढ्यातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशातच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

"माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नाही. आज महाविकास आघाडीवर इतकी वाईट वेळ यायला नको होती. शरद पवारांवर इतकी वाईट वेळ कधी आली नव्हती. त्यांनी‌ या भागाचे नेतृत्व केलं आहे. विकास न केल्याने सातत्याने चाचपणी करून उमेदवार बदलावा लागतोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे," असा टोला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 ranjitsinh naik nimbalkar madha lok sabha constituency
Navneet Rana : नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी न बोललेलं बरं; रवी राणांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर नवनीत राणांची प्रतिक्रिया

आज घोषणा होणार?

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी, तसेच मुंबईतील काही जागांवरुन वाद सुरू आहे. अशातच आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये सर्व फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये सातारा तसेच माढ्यातून उमेदवारी जाहीर होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

 ranjitsinh naik nimbalkar madha lok sabha constituency
Pandharpur News : गुढीपाडवानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी; एक किलोमीटर अंतरापर्यंत रांग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com